अहमदनगर ब्रेकिंग : मोटारसायकल चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : मोटारसायकल चोरणाऱ्या चोरटयास नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राहुल आजीनाथ शिंदे रा. चिंचपुर इजदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या संशयिताकडुन अनेक मोटारसायकल चोरीच्या घटना उघडकीस येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातील व्यापारी किरण पुरी यांची मोटारसायकल त्यांच्या मोबाईलच्या दुकानासमोरुन ८ आक्टोबर २०२३ रोजी चोरीस गेली होती.

बुधवारी भगवान गॅस एजन्सीचे संचालक अमोल गर्जे व त्यांचे सहकारी मुकुंद गर्जे हे एजन्सीसमोर आले असता, त्यांना किरण पुरी यांची मोटारसायकल तेथे दिसली. गर्जे यांनी पुरी यांना बोलावुन मोटारसायकलची खात्री केली असता, ती पुरी यांचीच होती.

काही वेळातच राहुल शिंदे तेथे आला व मोटारसायकल चालु करताच अमोल गर्जे व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला जागेवरच पकडून पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर व पोना. दत्तात्रय बडधे यांच्या ताब्यात दिले.

नागरिकांनी पकडूना पोलिसांच्या ताब्यात दिलेला राहुल शिंदे हा यापुर्वी टॅक्टर चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे याच्या सोबतच त्याचे आणखी किती साथीदार आहेत. त्यांनी किती गाड्या चोरल्या आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe