अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- राहुरी मध्ये क्वाॅरंटाइन केलेल्या पती-पत्नी आपल्या दोन लहान मुलासह पळून गेले आहेत. या जोडप्याने शाळेत क्वाॅरंटाइन केलेल्या एकाची मोटरसायकलही पळवून नेल्याने प्रशासनात खळबळ उडाली.
राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक रविवारी पहाटेच्या वेळात ही घटना घडली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून गावात दाखल होणाऱ्यांची तपासणी करून क्वाॅरंटाइन करण्याचे आदेश आहेत.
३ दिवसांपूर्वी या कुटुंबाला क्वाॅरंटाइन करून एका शाळेत ठेवण्यात आले होते. या शाळेत आणखी १० जणांना क्वाॅरंटाइन केले होते. शनिवारी रात्री या जोडप्याने बाहेर पडण्यासाठी गोंधळ घातल्याने सरपंच व पोलिस पाटलाने संपूर्ण रात्र शाळेजवळ जागून काढली.
मात्र, रविवारी पहाटे अंधाराचा फायदा घेऊन या जोडप्याने शाळेच्या गेटला लावलेले टाळे तारेच्या सहाय्याने काढून धूम ठोकली. त्यांचा रविवारी दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र तो व्यर्थ ठरला.
अखेर या जोडप्यां विरुद्ध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com