Onion Trading Business: ‘या’ शेतकरी पुत्राने चक्क सुरू केला कांद्याचा व्यापार! वार्षिक 20 लाखांची कमाई

Published on -

Onion Trading Business:- सध्या परिस्थितीमध्ये नोकरीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे सुशिक्षित तरुणांच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्याच नसल्याने बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर व्यवसायांकडे वळणे ही काळाची गरज आहे.

जर आपण पाहिले तर अनेक छोटे मोठे व्यवसाय करता येण्यासारखे असतात. परंतु जोपर्यंत मनाची इच्छा शक्ती त्या दृष्टिकोनातून तयार होत नाही तोपर्यंत आपण व्यवसाय करू शकत नाही हे तितकेच खरे आहे. त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंबातील तरुणांचा विचार केला तर  सध्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि यातून मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेत गेल्यानंतर त्या ठिकाणी घसरलेले दर त्यामुळे शेतकरी कुटुंबे खूप आर्थिक संकटांमध्ये सापडलेली आहेत.

त्यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुणांची स्थिती खूप दयनीय अशी स्थिती आहे. परंतु या परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये जर व्यवसाय करायचे ठरवले तर नक्कीच या माध्यमातून एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. हे तत्व गणेश हणपुडे नावाच्या युवकाने सत्य करून दाखवले असून या मुलाने कांद्याचा व्यापार सुरू केला असून वर्षाकाठी तो तब्बल वीस लाखांचे उत्पन्न या माध्यमातून मिळवत आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला कांदा व्यापारी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गणेश या युवकाने नोकरी करिता 2017 मध्ये पुणे गाठले. त्याला नाटकांची आवड असल्यामुळे काही कालावधी करिता त्यांनी नाटकांमध्ये देखील काम केले. एवढेच नाही तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमानाच्या दृष्टिकोनातून देखील त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते.

परंतु यामध्ये काही यश हाताला लागत नव्हते. परंतु पोटापाण्यासाठी त्यानंतर त्याने स्विगी आणि झोमॅटो इत्यादी मध्ये डिलिव्हरी बॉयचे देखील काम केले. हे काम करत असताना स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास सुरू केलेला होता. सिंधुदुर्ग या ठिकाणी त्याचा एक भाऊ नोकरी करत होता व त्या ठिकाणी गणेश हा गेला व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला.

परंतु या ठिकाणी असताना कांदा बाजारामध्ये फिरत असताना गणेशच्या लक्षात आले की त्या ठिकाणचे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा खरेदी करून जास्त दरामध्ये इतर ठिकाणी विक्री करतात. हे सगळी परिस्थिती पाहून कांदा विक्रीचा व्यापार करावा अशी कल्पना गणेशला सुचली व 2020 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.

कुठलाही नवीन व्यवसाय करायचा तर त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात व तसेच अडचणी गणेशला या व्यवसायात सुरुवातीला येऊ लागल्या. सुरुवातीला तो एका पिकअप गाडीमध्ये कांदा भरायचा व दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये विक्रीला पाठवायचा. अशा पद्धतीने सुरुवात करत त्याने कालांतराने परांडा या ठिकाणी गणेश ट्रेडर्स या नावाने व्यापार सुरू केला.

आज तो मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करतो व कंटेनरच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यांमध्ये तो कांदा पाठवतो. जर आज गणेशाचा कांदा व्यापाराचा टर्नओव्हर पाहिला तर तो वर्षाकाठी पाच कोटींचा आहे व वीस लाख रुपयांचा त्याला निव्वळ नफा या माध्यमातून मिळतो.गणेशाचा एक मावस भाऊ सुजित निंबाळकर हा जर्मन कंपनीमध्ये काम करत होता.

गणेशने त्याला देखील कांदा व्यापारातील नफ्याचे गणित समजावले व त्याला देखील नोकरी सोडून या व्यवसायात आले. नंतर या दोघांनी मिळून हा व्यवसाय पुढे नेला व आज या व्यवसायातील त्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींची घरात आहे. एवढेच नाही तर याच व्यवसायावर अवलंबून राहता गणेशने दोन वर्षापासून दिवाळीच्या सणानिमित्त फटाके विक्रीचा  व्यवसाय देखील केला व आठच दिवसात त्याला दीड लाख रुपयाचा नफा या माध्यमातून झाला.

अशाप्रकारे जर मनामध्ये इच्छाशक्ती व नवीन कल्पना सत्यात उतरवण्याची तयारी असेल तर माणूस यशस्वी होऊ शकतो. हे गणेशच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe