Sweet Lemon Cultivation:- व्यक्ती जेव्हा आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींनी मोठ्या प्रमाणावर अडचणी या येतच असतात. परंतु येणारे या अडचणी आणि समस्यांमधून जो मार्ग काढतो तो नक्कीच यशस्वी होतो. यात जर आपण शेती व्यवसायाचा विचार केला तर कितीही संकट आली तरी न डगमगता शेती करत राहणे हा गुण प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये दिसून येतो.
शेतकरी मोठ्या कष्टाने आणि परिस्थितीशी दोन हात करत शेती फुलवतात. त्यातल्या त्यात जर दुष्काळी पट्टा असेल व कोरडवाहू शेती असेल तर मात्र शेतकऱ्यांना शेती करताना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यायला लागते. परंतु तरीदेखील काही शेतकरी या परिस्थितीवर मोठ्या कष्टाने मात करतात व सुंदर अशी शेती फुलवतात.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धोंदलगाव येथील बळीराम वाघ यांचा विचार केला तर बँक अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम व त्यांची पत्नी लताताई वाघ यांनी मेस चा व्यवसाय काही दिवस केला व नंतर गावी येऊन पाच एकर असलेल्या शेतीमध्ये मोसंबी लागवड करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट केले व आज ते यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यांचे यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.
सेंद्रिय मोसंबी उत्पादनातून लाखोत उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धोंदलगाव येथील बळीराम वाघ व त्यांच्या पत्नी लताताई वाघ यांनी आपण कष्टाने त्यांच्या पाच एकर क्षेत्रामध्ये मोसंबीची लागवड केली व कोरडवाहू जमिनीत देखील त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरत लाखोत उत्पन्न मिळवले आहे.
बळीराम वाघ हे बँक अधिकाऱ्यांच्या गाडीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होते व त्यांची पत्नी लता वाघ या खानावळीचा व्यवसाय करत होत्या. परंतु कालांतराने त्यांची मुले नोकरीला लागल्यानंतर बळीराम व लताताई वाघ ह्या धोंदलगाव येथे 2016 मध्ये घरी आले व त्यांची घरची दहा एकर शेती करण्याचे त्यांनी निश्चित केले.
यामध्ये लताताई यांचा आग्रह होता की सेंद्रिय शेती करावी व या दृष्टिकोनातूनच त्यांनी पाच एकर च्या गटांमध्ये सेंद्रिय पद्धतीने मोसंबी बाग लागवड करण्याचे ठरवले. राहिलेल्या पाच एकर मध्ये पारंपारिक शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचे नियोजन आखले. सेंद्रिय शेतीची माहिती मिळवण्याकरिता बळीराम वाघ यांनी विविध शासकीय व खाजगी संस्था व कार्यालयांना भेटी दिल्या व त्यासोबतच या क्षेत्रातील व्यक्तींना भेटून बरीचशी माहिती गोळा केली.
या माहितीच्या माध्यमातून त्यांनी बारामती या ठिकाणहून न्यू शेलार कॉटन गोल्ड या जातीच्या 1130 मोसंबी कलमांची 15 बाय 15 फूट अंतरावर लागवड केली. परंतु 2018 मध्ये लागवड केलेल्या आहेत त्यांच्या या मोसंबी बागेला त्याच वर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना करावा लागला. परंतु या वाघ दांपत्याने हार न मानता दुसऱ्यांच्या शेतातून डोक्यावर पाणी वाहिले आणि मोसंबीची झाडे जगवली.
या बागेचे व्यवस्थापन कसे केले?
या बागेचे नियोजन करताना त्यांनी एका एकरला 12 ट्रॉली चांगले कूजलेले शेणखत वर्षातून एकदा टाकले व झाडांना गांडूळ खतांचे आच्छादन केले. यासोबतच दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क यांचे फवारणी केली. अशा पद्धतीने नियोजन करत असताना जेव्हा त्यांची बाग चार वर्षाची झाली तेव्हा त्या बागेतून आंब्या आणि मूर्ग असे दोन बहर वर्षात घेतले जातात.
मोठ्या कष्टातून त्यांना 2022 मध्ये 36 टन मोसंबीचे उत्पादन मिळाले व त्याला 18 ते 22 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये घेतलेल्या शेवटच्या बहरामध्ये 52 टन मोसंबीचे उत्पन्न मिळाले असून त्यामध्ये त्यांना 25 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. मध्ये सरासरी खर्च वजा जाता या मोसंबी फळ बागेतून त्यांना वार्षिक दहा ते पंधरा लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
आंतरपिकांची मिळाली साथ
जेव्हा त्यांनी मोसंबी बाग लागवड केली तेव्हा कृषी विभाग वैजापूर यांच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळाले व या पैशांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पाच एकर क्षेत्रामधून असलेल्या विहिरीतील पाणी मोसंबी बाग असलेल्या क्षेत्रांमध्ये पाईपलाईन करून आणले
व त्या माध्यमातून चार वर्षे सलग या मोसंबी बागेत कांदा, सोयाबीन, खीरा यासारखे अंतरपिके घेतली. या सगळ्यात मुळे शेतीत सेंद्रिय कर्ब तयार होण्यास मदत झालीव मातीची पाणी टिकून ठेवण्याची क्षमता वाढली.
अशा पद्धतीने या दांपत्याने मोठ्या कष्टाने मोसंबी बाग फुलवली व आज ते लाखात उत्पन्न मिळवत आहेत.