UPI Payment: तुम्ही देखील यूपीआयद्वारे पेमेंट करता का? तर नवीन वर्षात बदललेले ‘हे’ नवीन नियम नक्कीच वाचा

Published on -

UPI Payment:- सध्या मोठ्या प्रमाणावर युपीआयच्या माध्यमातून पेमेंट केले जाते. याकरिता गुगल पे किंवा फोन पे, पेटीएम यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. अगदी छोट्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर करायचे असेल किंवा दुकानदाराला छोटी रक्कम जरी द्यायची असेल तरी मोठ्या प्रमाणावर आता यूपीआयचा वापर केला जातो.

जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये यूपीआयचे 40 कोटीच्या आसपास वापर करते असून प्राप्त आकडेवारीनुसार यूपीआयच्या माध्यमातून 2023 या वर्षांमध्ये सोळा लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झालेले आहेत. परंतु या माध्यमातून सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे.

तसेच येणाऱ्या काही वर्षांमध्ये यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होण्याची एक शक्यता आहे. याच अनुषंगाने आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून यूपीआय व्यवहारांच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर यूपीआयच्या माध्यमातूनच पेमेंट करत असणार तर तुमच्यासाठी ही माहिती असणे खूप गरजेचे आहे.

 रिझर्व बँक ऑफ इंडियाने यूपीआयच्या नियमांमध्ये केले महत्त्वाचे बदल

1- तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे तसेच भीम ॲप व पेटीएम सारखे एप्लीकेशन इन्स्टॉल केलेले असतील. परंतु या एप्लीकेशन चा वापर तुम्ही जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकदा देखील केला नसेल तर एक जानेवारी 2024 पासून तुमचा यूपीआय आयडी ब्लॉक केला जाणार असून सुरक्षिततेच्या कारणामुळे तो तात्पुरत्या स्वरूपात बंद केला जाणार आहे.

2- तुम्ही जर यूपीएच्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर आता दररोज व्यवहाराचे मर्यादा आता एक लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

3- तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एका दिवसा करिता पाच लाख रुपयापर्यंत शुल्क किंवा रक्कम भरायची असेल तर ती आता तुम्हाला युपीआयच्या माध्यमातून भरता येणे शक्य होणार आहे.

4- आता दोन हजार रुपयांपेक्षा जास्त सेटलमेंट होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही जर एखाद्या विक्रेत्याला पैसे ट्रान्सफर केले तर त्याच्या अकाउंटला ते लगेच जमा व्हायचे. परंतु आता जानेवारी 2024 पासून जर तुम्ही कोणताही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त

रक्कम यूपीआयच्या माध्यमातून ट्रान्सफर केली तर ती त्याच्या खात्यावर जमा व्हायला चार तास लागणार आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमीच पेमेंट करत असाल तर त्यांना हा नियम लागू होणार नाही.

5- तसे यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही नवीन व्यक्तीला किंवा दुकानदाराला पेमेंट केले व तुम्हाला ते कॅन्सल करायचे आहे तर तुम्ही चार तासाच्या आत ते कॅन्सल करू शकणार आहात व त्यानंतर ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे आता चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे गेले तर आता ते पैसे परत मिळू शकणार आहेत. तसेच सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी देखील याचा वापर होणार आहे.

6- आता विक्रेत्याचे खरे नाव तुम्हाला माहित करण्यास देखील मदत होणार आहे. कारण विक्रेत्याचे सिम कार्ड कोणाच्याही नावाने असले तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल त्याचं नाव तुम्हाला यूपीआय पेमेंट करताना पाहायला मिळणार आहे.

7- बँकेला विनंती करून आता तुम्ही बॅलन्स रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकणार आहात. यामध्ये तुमची बँक ट्रॅक रेकॉर्ड किंवा सिबिल तपासून तुम्हाला ही सुविधा देऊ शकते.

8- आता यूपीआय एटीएम मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहेत. यूपीआय एटीएम मशीनमध्ये तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे काढता येणे शक्य होणार आहे.

9- तुम्ही जर यूपीआय वॉलेट मधून पेमेंट केले तर तुम्हाला 1.1 टक्के सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe