Cleanest Village In India:- भारत विविधतेने नटलेला देश असून नैसर्गिक साधन संपत्ती पासून तर लोकांच्या प्रथा परंपरा तसेच सण उत्सव, चालरीती आणि बोलीभाषा यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता दिसून येते. तसेच भारतामध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत की त्यांच्या वेगळेपणामुळे ते संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.
मग ते भौगोलिक वैशिष्ट्य असो किंवा त्या ठिकाणी राहणारे स्थानिक लोक किंवा त्यांच्या परंपरा इत्यादींमुळे खूप प्रसिद्ध आहेत. अगदी याच पद्धतीने आपण भारताचा विचार केला तर काही शहरे आणि गावे हे त्यांच्या स्वच्छतेमुळे देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. स्वच्छता म्हटले म्हणजे सगळ्यांना हवीशी असणारी बाब असते.
जर आपण शहरांचा विचार केला तर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी तसेच धूळ, वाहन कोंडी इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छतेचे वातावरण पसरलेले असते. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे शहरांच्या तुलनेत खेडे हे अतिशय शांत व स्वच्छ व शुद्ध हवेचा समृद्ध स्त्रोत असतो.
शहरी भागात राहणाऱ्या लोकांना नेहमी खेड्यांमध्ये येऊन राहायला आवडते. याच मुद्द्याला धरून जर आपण भारतातील काही खेड्यांचा विचार केला तर भारतामध्ये अशी खेडे आहेत की त्याच्या स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे भारतातील अशी कोणती गावे आहेत की ते संपूर्ण भारतात त्यांच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत.त्या गावांची या लेखात माहिती घेऊ.
ही आहेत भारतातील सर्वात स्वच्छ गावे
1- नाको वैली( हिमाचल प्रदेश)- हे खेडे हिमाचल प्रदेश राज्यात असून तिबेट च्या सीमेजवळ बसलेले एक खेडेगाव आहे. हे गाव खूप शांततापूर्ण असून या गावांमध्ये जुने मठ आहेत व या गावात बौद्ध लामांकडून एक सुंदर असं जुने मंदिर स्थापन करण्यात आलेले आहे व या मंदिराच्या भिंतीवर सुंदर अशी चित्रे असून ते मनाला खूप भावणारे अशी चित्रे आहेत. हे गाव त्याच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
2- माऊलिनांग– या गावाला आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते व त्यामुळे 2003 मध्ये डिस्कवर इंडिया द्वारे आशीयातील सर्व स्वच्छ गाव या उपाधीमुळे या गावाला सन्मानित करण्यात आले होते. या गावातील 95 घरांमध्ये बांबूपासून कचरा पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत व या कचरा पेटीत घरातील संपूर्ण कचरा टाकला जातो
व तो एका ठिकाणी एकत्र केला जातो. एकत्र झालेला कचरा एका खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार करून त्या खताचा वापर केला जातो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे गाव 100% सुशिक्षित असून प्लास्टिक बंदी देखील या गावात आहे. गावाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाव जर कोणी धुम्रपान करताना आढळून आले तर त्याच्याकडून दंड स्वरूपात रक्कम आकारली जाते.
3- खोनोमा– नागालँड राज्याची राजधानी कोहिमा पासून 20 किलोमीटर अंतरावर हे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास 3000 आहे व हे गाव सातशे वर्ष जुने आहे असे म्हटले जाते. हे गाव त्या ठिकाणी असलेली जंगल आणि भाताच्या लागवडीकरिता खूप प्रसिद्ध आहे.
4- इडुक्की– हे केरळ राज्यातील एक गाव असून खूप सुंदर असे गाव आहे. हे गाव त्या ठिकाणी असलेल्या शांत वातावरणाकरिता प्रसिद्ध आहे. या गावातील निसर्ग सौंदर्य मनात करून राहील अशा पद्धतीचे आहे. या ठिकाणी असलेले सुंदर धबधबे तसेच रस्ते व जंगल आणि तलाव लक्ष वेधून घेणारे आहेत.
अशाप्रकारे हे भारतातील चार गावे सर्वात स्वच्छ गावे म्हणून भारतात ओळखले जातात.