लग्नानंतरही सोबत आहेत 5 गर्लफ्रेण्ड,’या’क्रिकेटरचा खुलासा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  कोरोनामुळं सध्या सर्वच बंद आहे. याचा परिणाम क्रीडाजगतावरही झाला आहे. सध्या सर्व खेळाडू आपल्या घरांमध्ये असून चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात.

अशातच भारतीय संघाचा स्टार फलंदाज मनीष पांडेनं लग्नानंतरही त्याच्या 5 गर्लफ्रेण्ड असल्याचा खुलासा केला आहे. मनीष पांडे म्हणतो , माझ्या बॅगमध्ये 5 गर्लफ्रेण्ड कायम असतात.

मनीष पांडेनं आपल्या बॅटची तुलना गर्लफ्रेण्डशी केली आहे. कर्नाटकच्या हा क्रिकेटपटू आपल्या बॅटना प्रेयसीप्रमाणं जपून ठेवतो. त्यांच्याशी प्रेमानं वागतो.

मनीषनं सांगितले की, खरं प्रेम तो पत्नी अश्रिता शेट्टीशीच करतो, पण बॅटही त्याचं सर्वस्व आहे. मनीषच्या 5 आवडत्या बॅट असून, त्या सगळ्या त्याच्या आवडत्या आहेत.

मनीषने असेही सांगितले की, जेव्हा जेव्हा तो निराश होतो तेव्हा तेव्हा तो आपल्या बॅटला घेऊन बसतो. क्रिकबझच्या कार्यक्रमात मनीष पांडेनं सांगितले की, त्याच्या बॅट या गर्लफ्रेंडप्रमाणे आहेत.

खासकरुन जेव्हा तो सामना खेळत असतो आणि त्याची पत्नी जवळपास नसते. तेव्हा तो आपल्या बॅटशी भांडतो. त्यांच्या बॅटशीही भांडतात. एवढेच नाही तर प्रसंगाप्रमाणे तो आपल्या या खास मैत्रीणींशी गप्पा मारतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment