Poisonous Snake Species: भारतातील ‘हे’ 5 साप आहेत अतिविषारी! जर घेतला चावा तर पाणीही मागू देत नाहीत

Ajay Patil
Published:
poisonous snake species

Poisonous Snake Species:- बऱ्याचदा आपण शेतामध्ये काम करत असतो किंवा एखाद्या जंगल सफारीला किंवा फिरायला गेलेलो असतो तेव्हा झाडाझुडपांमध्ये आपल्याला साप दिसून येतात. जेव्हा आपल्याला साप दिसतो तेव्हा आपली भीतीने त्रिधातिरपीट उडते. कारण साप म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्यासमोर येतो तो सापाचा चावा आणि झालेले मृत्यू.

त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये सापाबद्दल अतिशय भीती दाटून भरलेली असते. परंतु सापांच्या बद्दल पाहिले तर बहुतेक साप हे विषारी नसतात. परंतु भारतामध्ये असे काही साप आहेत की ते विषारी असून जर त्यांनी चावले तर काही मिनिटांमध्ये देखील मृत्यू होण्याची शक्यता असते. असे विषारी साप चावल्याबरोबर देखील हृदयाचे ठोके बंद होऊ शकतात इतके हे साप विषारी आहेत. अशाच काही महत्त्वाच्या विषारी सापाबद्दल आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

 भारतातील विषारी साप

1- इंडियन क्रेट( सर्वात विषारी साप)- हा साप प्रामुख्याने ग्रामीण भागात व जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. सर्वाधिक मानवाला चावा घेणारा साप म्हणून याला ओळखतात व या सापाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन असते. या सापाने जर चावा घेतला तर व्यक्तीचा 45 मिनिटांच्या आत मृत्यू होऊ शकतो. क्रेट जातीच्या सापाची लांबी साडेसहा फूट असते व तो दहा ते सतरा वर्षे वयापर्यंत जगतो.

2- रसेल वायपर भारतामध्ये हा साप सर्वत्र आढळून येतो. इतर सापांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त या सापाच्या चाव्याने प्राण जातात. रसेल वायपर जातीच्या सापाने जर चावा घेतला तर  शरीरातील मज्जा संस्था प्रभावित होऊन अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.

हा साप चावल्यामुळे मेंदूत अंतर्गत रक्तस्राव, तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. जर हा साप चावल्यानंतर अँटीव्हेनम मिळाले नाही तर 45 मिनिटात मृत्यू होऊ शकतो. हा साप निशाचर म्हणून ओळखला जातो व रात्री मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो.

3- स्वास्केल्ड वाइपर हा दिसायला खूप लहान साप असतो परंतु खूप विषारी असतो. या सापाचे डोळे आणि मानेपेक्षा रुंद डोके यामुळे तो इतर सापांपेक्षा वेगळा दिसतो. साधारणपणे वालुकामय, खडकाळ आणि मऊ माती असलेल्या भागांमध्ये हा साप आढळून येतो व याची लांबी 2.6 फुटांपेक्षा जास्त नसते. या सापाच्या चाव्यामुळे जगातील बहुतेक लोकांचा मृत्यू होतो. या सापाचे विषरोधक उपलब्ध आहे. तरी देखील या सापाच्या चाव्यामुळे होणारा मृत्यू दर पाहिला तर तो 20% इतका आहे.

4- इंडियन कोब्रा भारतामध्ये कोब्रा सापाचे अनेक प्रकार आढळून येतात. कोब्रा साप हा सात फुटापर्यंत लांब असू शकतो व संपूर्ण भारतामध्ये आढळून येतो. जर या सापाने चावा घेतला तर व्यक्तीचा दोन तासाच्या आत मृत्यू होऊ शकतो. या सापाच्या विषामुळे शरीर सुन्न होते व श्वसन प्रणाली निकामी होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

5- किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब असलेला विषारी साप आहे व याची लांबी 5.5 मीटर पर्यंत असू शकते. हा भारतातीलच नव्हे तर जगातील विषारी सापांमध्ये मोडला जातो. विशेष म्हणजे किंग कोब्राला शिकारीला मारण्याकरिता चावण्याची गरज राहत नाही. तो दोन मीटर अंतरावर विष फेकून देखील भक्षाला आंधळे करू शकतो. माणसाच्या मृत्यू होण्यासाठी किंग कोब्राचा एक चावा पुरेसा ठरतो. हा साप चावल्यानंतर तीस मिनिटांच्या आतमध्ये जर उपचार केले गेले नाहीत तर व्यक्तीचा मृत्यू होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe