7 Seater Car: बजेटमध्ये कुटुंबाकरिता 7 सीटर कार घ्यायची आहे का? तर ‘या’ कार ठरतील तुम्हाला फायद्याच्या! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
7 seater car

7 Seater Car:- जर आपण साधारणपणे मध्यमवर्ग कुटुंबांचा विचार केला तर प्रत्येक जणांचे स्वतःचे घर आणि स्वतःची कार असावी ही स्वप्न असते. आजकालची तरुण-तरुणी जेव्हा उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायला लागतात तेव्हा त्यांचे स्वतःचे घर आणि कार घेण्याचं स्वप्न हे असत.

यामध्ये जर आपण कारचा विचार केला तर अनेक जण आपल्या कुटुंबातील सदस्य किती आहेत व आपल्या कुटुंबाला एकत्र आरामात जाता येईल अशा कारच्या शोधात असतात. फॅमिली करिता प्रामुख्याने सात सीटर कार घेण्याचा विचार बरेच जण करतात.

परंतु आपण जेव्हा कुठलेही वाहन खरेदी करतो तेव्हा  आपल्याला परवडेल अशा बजेटमध्ये आणि चांगल्या स्वरूपाची वैशिष्ट्ये असलेल्या कारच्या शोधात असतो. याच मुद्द्याला धरून जर पाहिले तर या लेखात आपण अशा काही सात सीटर कार पाहणार आहोत की ज्या तुमच्या बजेटमध्ये ही असतील आणि तुमच्या कुटुंबासाठी देखील बेस्ट असतील अशा काही कारची माहिती घेणार आहोत.

 या आहेत बजेटमध्ये असणाऱ्या 7 सीटर कार

1- मारुती एरटिगा या कारमध्ये माइल्ड हायब्रीड सह दीड लिटर पेट्रोल इंजिन असून ते 103 पीएस/ 168 एनएमचा आऊटपुट जनरेट करू शकते. या कारमध्ये ट्रान्समिशन करिता सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय देण्यात आला आहे. या कारचे मायलेज 20.3 Kmpl ते 26.11 Kmpl असून तिची सिटिंग कॅपॅसिटी सात जणांची आहे. या कारची एक्स शोरूम किंमत पहिली तर ती आठ लाख 64 हजार ते 13 लाख 8 हजार रुपये इतकी आहे.

New Maruti Ertiga Price 2024, Images, Colours & Reviews

2- रेनॉल्ट ट्रायबर या कारमध्ये 1-L एनए पेट्रोल इंजिन आहे. ते 72 पीएस/ 96 एन एम आउटपुट जनरेट करते व ट्रान्समिशन साठी या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्याय देण्यात आले आहे. या कारचे मायलेज 18.2 Kmpl ते 20 Kmpl असून ही कार 7 सीटर आहे. या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 33 हजार ते आठ लाख 97 हजार रुपये इतकी आहे.

Renault Triber - Wikipedia

3- महिंद्रा बोलेरो या कारमध्ये 1.5 लिटर टर्बो चार्ज केलेली डिझेल इंजन देण्यात आले असून ते 75 पीएस आणि 210 एनएमचे आउटपुट जनरेट करू शकते. ही कार पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. या कारचे मायलेज 16.7 Kmpl पर्यंत आहे व ही सात सीटर एसयुव्ही कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 79 हजार ते दहा लाख 80 हजार रुपये आहे.

Mahindra Bolero : Price, Mileage, Images, Specs & Reviews - carandbike.com

4- किया कॅरेन्सी या कारमध्ये तीन इंजिन पर्याय मिळतात. यातील पहिला म्हणजे 1.5 लिटर पेट्रोल, 1.5-L टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रान्समिशन साठी सहा स्पीड मॅन्युअल, सहा स्पीड iMT, सात स्पीड डीसीटी, सहा स्पीड एएमटीचे पर्याय उपलब्ध आहेत.

या कारचे मायलेज 17.9 Kmpl ते 21 Kmpl पर्यंत असून ही सात सीटर एसयुव्ही कार असून तिच्यामध्ये सहा एअरबॅग देण्यात आलेले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत दहा लाख 84 हजार ते 19 लाख 13 हजार रुपये इतके आहे.

Kia Carens Price - Images, Review & Colours

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe