एअरटेलचा ‘डेटा’धमाका ; ‘हा’प्लॅन घ्या आणि वापरा दिवसभरात 50 GB डेटा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन बाजारात आणत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना खूप इंटरनेट हवे आहे.

याचा फायदा घेत एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही ५० जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता. एअरटेलच्या या खास प्लॅनमुळे जिओच्या वर्क फॉर्म होम प्लॅनला चांगलीच टक्कर बसणार आहे.

एअरटेलच्या या नव्या डेटा व्हाऊचरची किंमत २५१ रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड ५० जीबी डेटा वापरता येणार आहे. पॅकची वैधतेनुसार ग्राहकांना एका दिवसात डेटा संपवायचा आहे.

हे फक्त डेटासाठी व्हाऊचर असल्यामुळे यासोबत एसएमएस किंवा मोफत कॉलिंगची सुविधा नाही. त्याचप्रमाणे एअरटेलने आपल्या ९८ रूपयांच्या डेटा व्हाऊचर मध्ये दिला जाणारा डेटा डबल केला आहे.

सुरूवातीला ९८ रूपयांत ६ जीबी डेटा मिळत होता आता १२ जीबी डेटा दिला आहे. त्याशिवाय एअरटेलने ग्राहकांसाठी ४०१ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह रोज ३ GB डेटा मिळणार आहे.

यासोबत DisneyHotstar VIPचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल आणि रोज १०० SMS मिळणार आहेत. यामध्ये ५५८ रुपयांचा ५६ दिवसांसाठी आणखी एक प्लॅन आहे. त्यामध्ये ३ GB डेटा, १०० SMS दरदिवशी यासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment