Shevgaon News : जमिनीच्या वादातून एका झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जोहरापूर (ता. शेवगाव) नजीकच्या ढोरावस्ती परिसरात रविवारी (दि.४) दुपारी घडली.
या संदर्भात दानेश शहादेव भारस्कर (वय २७ रा. रामनगर, ता. शेवगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी काही तासातच दहा आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
शहादेव भारस्कर (रा. रामनगर, ता. शेवगाव) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आजीच्या नावावर असलेली दीड एकर शेतजमीन जोपर्यंत नावावर करून देत नाही तोपर्यंत फिर्यादीच्या बहिणीस आरोपी शिवाजी भारस्कर याचा भाचा अमोल घाडगे हा नांदवणार नाही, असे सांगण्यात आले.
त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार हे आरोपी शिवाजी भारस्कर व इतरांना समजावून सांगत होते.त्यावेळी आरोपींनी फिर्यादीचे वडील शहादेव भारस्कर यांच्या छातीला लाथ मारली. त्यानंतर ते बेशुद्ध पडल्याने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शिवाजी विश्वनाथ भारस्कर, हरिभाऊ महादेव भारस्कर, दादा ऊर्फ अमर शिवाजी भारस्कर, गणेश राजेंद्र आव्हाड, महेश राजेंद्र आव्हाड, आदेश बापू नेटके, सनी लक्ष्मण अडागळे, सविता रंजित काते, ज्योती सनी अडागळे, सीताबाई महादेव भारस्कर, सीमा नारायण घाडगे, दुर्गा राजेद्र आव्हाड आदी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तपासाची चक्रे फिरविली. वेगवेगळी दोन पोलिस पथके रवाना करून नाकाबंदी लावून आरोपींचा शोध घेतला. आरोपी एका वाहनातून पैठण रस्त्याने पळून जात असताना पोलिस ‘पथकाने काही तासातच दहा आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी दोन आरोपी फरार झाले आहेत.
हे पण वाचा : विधानसभेला सगळ्यात मोठी लढत अहमदनगर जिल्ह्यात होणार ? ह्या मतदारसंघात रंगणार पवार विरुद्ध पवार सामना ?
लोकसभा निवडणुकीसाठी २० हजार कर्मचारी तैनात…! दोन्ही मतदारसंघात एकूण ३ हजार ७३१ मतदान केंद्र
संदिप मिटके पुन्हा अहमदनगरमध्ये परतणार ! आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली…