लोकसभा निवडणुकीसाठी२० हजार कर्मचारी तैनात…! दोन्ही मतदारसंघात एकूण ३ हजार ७३१ मतदान केंद्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्व तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात लोकसभेचे अहमदनगर आणि शिर्डी असे दोन मतदार संघ असून दोन्ही मतदारसंघांतील मतदान केंद्रांची एकूण संख्या ३ हजार ७३१ इतकी आहे.

एका मतदान केंद्रासाठी प्रत्येकी पाच प्रमाणे मतदान प्रक्रियेसाठी साडेआठरा हजार अधिक २० % राखीव या प्रमाणे तब्बल २० हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने याची पूर्व तयारी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या तपासणीने सुरु झाली.आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संचालनात उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांच्या संचालनात जिल्ह्याच्या मतदार यादीचे काम करण्यात आले.

दि.२३ जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी मतदान केंद्रांची फेररचना करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर १ हजार ५०० पेक्षा मतदार संख्या जास्त राहाणार नाही,याची सूचना आयोगाने दिली.

त्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ७३१ आहे. मतदान प्रकियेसाठी प्रत्येक केंद्रावर ५ प्रमाणे एकूण १८ हजार ६५५ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

तसेच २० % कर्मचारी राखीव ठेवावे लागत असल्याने लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी एकूण २० हजार कर्मचाऱ्यांची आयोगाद्वारे नियुक्त करण्यात येणार आहे.