पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजना देतात सर्वाधिक व्याज ? पहा संपूर्ण यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : आपल्या देशात अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून अधिकचा परतावा मिळत असल्याने येथे गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहतेच असे नाही.

येथे लॉसेस होण्याची देखील शक्यता असते. हेच कारण आहे की अनेकजण आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे चित्र आहे. याशिवाय बँकेच्या एफडी योजनेत देखील गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजना गुंतवणूकदारांना सर्वाधिक व्याज देत आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्ही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर याचा तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या बचत योजना खालील प्रमाणे

खरंतर पोस्ट ऑफिस विविध प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. या पोस्टाच्या स्मॉल सेविंग स्कीम गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देत आहे. मात्र यातील सर्वाधिक व्याज देणारी स्मॉल सेविंग स्कीम कोणती? कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे? हे आज आपण पाहणार आहोत.

दरम्यान, आज आपण ज्या पोस्टाच्या स्मॉल सेविंग स्कीम बाबत जाणून घेणार आहोत त्यांच्या व्याजदराचे रिविजन प्रत्येक तीन महिन्यांनी केले जाते. म्हणजेच या योजनांचे व्याजदर प्रत्येक तीन महिन्यांनी सुधारित होत असते.

सिनियर सिटीजन सेविंग स्कीम : या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.2% या व्याज दराने रिटर्न दिले जात आहेत.

सुकन्या समृद्धी योजना : या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना देखील 8.2% या व्याजदराने रिटर्न दिले जात आहेत.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम : नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम किंवा एनएससी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.5% या व्याजदराने रिटर्न दिले जात आहेत.

किसान विकास पत्र : किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यासाठी गुंतवणूक केल्यास 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

टाईम डिपॉझिट स्कीम : पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखतात. या योजनेत एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. दरम्यान जर या योजनेत पाच वर्ष कालावधीसाठी एफडी केली तर गुंतवणूकदारांना 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

मंथली इनकम स्कीम : पोस्ट ऑफिसची ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.4% या व्याजदराने रिटर्न दिले जात आहे.