Success story : कृषी क्षेत्रामध्ये अनेकविध पिकांची लागवड करता येते व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवता येते. यामध्ये काही पिकांची लागवड ही कमी कालावधीत उत्पादन द्यायला सक्षम असतात व यामध्ये आपल्याला भाजीपाला पिकांचा समावेश करता येईल.
काही पिकांचे उत्पादन हाती यायला काही महिने किंवा वर्ष लागतात. परंतु यामध्ये जर आपण साग किंवा बांबू, महोगणी सारख्या वृक्षांची लागवड केली तर मात्र उत्पादन यायला दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी जायला लागतो. परंतु यासारख्या वृक्ष पिकांची लागवड करण्याला आणि त्यांच्या व्यवस्थापनामध्ये खर्च खूप कमी येतो व त्यामानाने मात्र उत्पन्न हे लाखो आणि कोटींमध्ये मिळते. परंतु यासाठी आपल्याला संयम आणि वाट पाहण्याची क्षमता ठेवणे खूप गरजेचे असते.
याच प्रकारे उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील रहिवासी असलेल्या अविनाश कुमार यांनी 1998 ते 2005 अशा कालावधीमध्ये पोलीस खात्यात नोकरी केली व 2005 मध्ये राजीनामा देऊन शेती करायला सुरुवात केली.
शेती करत असताना 2016 मध्ये त्यांनी चंदन लागवड करण्याचा निर्णय घेतला व फक्त पन्नास सफेद चंदनाच्या रोपांची लागवड त्यांनी केली. परंतु आता अजून काही वर्षानंतर मात्र ही सफेद चंदनाची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना आर्थिक उत्पन्न देईल अशी अपेक्षा त्यांना आहे.
पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत सुरू केली शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर येथील रहिवासी असलेल्या अविनाश कुमार यादव यांनी 2005 मध्ये पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते शेती व्यवसायाकडे वळले.
शेती करत असताना त्यांना सफेद चंदनाची लागवड करण्याचे सुचले व याकरिता त्यांनी कर्नाटक राज्यातून दोनशे रुपये प्रतिरोप त्याप्रमाणे 50 रोपे आणले व त्यांची लागवड केली. आज त्यांच्या शेतामध्ये 13 ते 14 ft उंचीची चंदनाची झाडे असून हे झाड पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर तीस ते पस्तीस हजार रुपयांना विकले जाईल अशी शक्यता आहे.
अजून पर्यंत त्यांनी एकही झाडाची विक्री केलेली नाही. परंतु येणाऱ्या दहा वर्षात या झाडांच्या माध्यमातून अविनाश यांना करोडो रुपये मिळणार हे मात्र निश्चित आहे. सध्या जर आपण सफेद चंदनाचा बाजार भाव पाहिला तर तो बाराशे रुपये किलो प्रमाणे आहे.
सफेद चंदनाबद्दल महत्वाची माहिती
तसं पाहायला गेले तर ओसाड जमिनीवर आणि कमी पाण्यामध्ये सफेद चंदनाचे उत्पादन चांगले येते. लागवड केल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष महत्त्वाचे असतात व या कालावधीत काळजी घेणे गरजेचे असते. याचे झाड 15 ते 20 फुट उंचीपर्यंत वाढते व झाड पूर्णपणे परिपक्व होण्याकरिता साधारणपणे 15 ते 20 वर्षांचा कालावधी जायला लागतो.
सफेद चंदनाचा वापर औषधे, साबण तसेच अगरबत्ती, जपमाळ, लाकडी खेळणी, फर्निचर, अत्तर अनेक वस्तू बनवण्यासाठी केला जातो. याबाबत अविनाश कुमार यांनी माहिती दिली की एका एकरमध्ये 410 चंदनाचे रोपांची लागवड करता येते.
दोन झाडांमध्ये दहा फुटाचे अंतर असणे गरजेचे असते व एका एकर करिता चंदन लागवडीसाठी एक लाख रुपयांचा खर्च येतो. विशेष म्हणजे चंदनाची लागवड तुम्ही कोणत्याही हंगामामध्ये करू शकतात. फक्त तुम्ही ज्या झाडाची लागवड करणार आहात त्या झाडाचे म्हणजेच रोपाचे वय कमीत कमी दोन वर्ष असावे.