Car Care Tips:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत आहे. त्यामुळे या वाढत्या उष्णतेने सगळेजण हैराण झालेले आहेत. प्रचंड असलेल्या उष्णतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या देखील निर्माण होतात.
ज्याप्रमाणे मनुष्याला किंवा जनावरांना या उष्णतेचा त्रास होतो तसाच प्रकारच्या काही समस्या या वाहने तसेच काही उपकरणांमध्ये देखील निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला अशा उपकरण किंवा वाहनाचे देखील या कालावधीत विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
यामध्ये आपण जर कारचे उदाहरण घेतले तर बऱ्याचदा काही कामानिमित्त कारने आपण प्रवास करतो व पार्क करताना ती सावलीत पार्क न करता उन्हामध्ये पार्क करतो. त्यामुळे साहजिकच प्रचंड असलेल्या उन्हामुळे गाडी तापते.
त्यानंतर तुम्हाला कार आतून थंड करायचे असेल तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. तोपर्यंत मात्र कारमध्ये बसल्यानंतर जीवाची लाही लाही होते. यातच आपण या लेखांमध्ये अशा काही सोप्या गोष्टी बघणार आहोत त्यामुळे तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये कार थंड करू शकणार आहात.
सगळ्यात अगोदर या गोष्टीकडे लक्ष दया
आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण कारमध्ये बसतो तेव्हा लागलीस एसी ऑन करून त्याला जास्तीत जास्त लिमिट पर्यंत चालवायचा प्रयत्न करतो. यामध्ये आपला उद्देश असतो की गाडी लवकरात लवकर थंड व्हावी.
परंतु जर उन्हात गाडी उभी असेल तर कारच्या आतील तापमान साधारणपणे 50 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते व एसी चालू केल्यामुळे आपण गाडीच्या काचा देखील बंद करून ठेवतो. परंतु या पद्धतीने देखील गाडी कुलिंग व्हायला खूप वेळ लागतो.
असं न करता गाडीच्या आतले तापमान अगोदर कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे व नंतरच एसी सुरू करून कुलिंग करणे गरजेचे आहे.
गाडी थंड करण्यासाठी या स्टेप्स वापरा
1- सगळ्यात अगोदर तुम्ही गाडीत बसाल तेव्हा चारही विंडो खाली करणे गरजेचे आहे. म्हणजे चारही खिडक्या उघड्या कराव्यात.
2- त्यानंतर फॅन सुरू करा व त्याला फुल स्पीड द्या. यामध्ये फक्त तुम्हाला फॅन सुरू करायचा आहे व एअर सर्क्युलेशन बटन बंद करा.
3- एअर फ्लो बदला. बऱ्याचदा एअरफ्लो हा चेहऱ्याकडे असतो. अशावेळी तो पायांकडे करा. असं केल्यामुळे कारचे जे काही आतील तापमान असते ते बाहेरच्या तापमाना इतकं व्हायला मदत होते.
4- दोन मिनिटापर्यंत फॅन सुरू ठेवा व नंतर पावर विंडो बंद करा.
5- पावर विंडो बंद केल्यानंतर एसी ऑन करावा.
6- ही पद्धत अवलंबल्यामुळे कार दोन मिनिटापेक्षा कमी कालावधीत थंड होते.
7- काल थंड झाल्यावर एअर सर्क्युलेशनचे बटन ऑन करावे. जेणेकरून मागच्या सीट कडे हवेचा प्रवाह वाढण्यास मदत होते.
अशाप्रकारे तुम्ही या छोट्या स्टेप्स फॉलो केल्यावर गाडी पाच मिनिटाच्या आतमध्ये थंड करू शकता.