Tur Crop Variety :- भारतात आणि महाराष्ट्रामध्ये तूर या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तूर हे प्रमुख दाळवर्गीय पीक असल्याने बाजारपेठेत कायम तिला चांगली मागणी असते व बाजारभाव देखील चांगला मिळतो.
खास करून जर आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिले तर खरीप हंगामामध्ये तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. बरेच शेतकरी मुख्य पीक म्हणून तुर पिकाची लागवड करतात तर काही शेतकरी आंतरपीक म्हणून तूर पिकाची लागवड करण्याला प्राधान्य देतात.
कपाशी सारख्या पिकांमध्ये तुर या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला जातो. आर्थिक दृष्टिकोनातून जर बघितले तर खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन आणि खरीप मक्यानंतर तूर या पिकाचा क्रमांक लागतो. त्यामुळे जे शेतकरी तूर लागवड करतात ते कायम चांगल्या उत्पादन देणाऱ्या वरायटींच्या शोधात असतात.
तुरीच्या देखील अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत व त्यांचे त्यांचे वेगवेगळे असे वैशिष्ट्य आहेत.या अनुषंगाने या लेखामध्ये आपण महाराष्ट्रात लागवड करता येण्याजोग्या आणि भरघोस उत्पादन देतील अशा तुरीच्या काही व्हरायटींची माहिती या लेखात घेणार आहोत.
या हे तुरीच्या उत्तम उत्पादन देणाऱ्या व्हरायटी
1- फुले राजेश्वरी- हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले असून हा एक सुधारित वाण आहे. लागवडीनंतर लवकर काढणीस येणाऱ्या तुरीच्या व्हरायटीमध्ये याचा समावेश होतो. साधारणपणे लागवड केल्यानंतर ही व्हरायटी 140 दिवसांमध्ये काढणीस तयार होते असा देखील दावा करण्यात येतो.
सलग लागवड म्हणजेच मुख्य पीक म्हणून देखील ही व्हरायटी उत्तम आहेस आणि आंतरपीक म्हणून देखील चांगली आहे. या व्हरायटीची दाणे लाल रंगाचे असतात व बाजारात चांगला बाजार भाव मिळतो.
2- बीडीएन 708 अमोल- महाराष्ट्रात उत्पादित होणारी तुरीची ही एक सुधारित वरायटी असून महाराष्ट्रमध्ये या व्हरायटीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या व्हरायटीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाहू क्षेत्रात लागवड करण्यासाठी शिफारस केली जाते.
मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये लागवड करण्याचा सल्ला देखील जाणकार देतात. तुरीची ही व्हरायटी लागवडीनंतर 155 ते 160 दिवसात काढणीस तयार होते.
3- आयसीपीएल 87119 आशा- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये तुरीची ही व्हरायटी विशेष प्रसिद्ध आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या व्हरायटीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. लागवडीनंतर साधारणपणे 190 दिवसात ही काढणीस तयार होते व दाणे लाल रंगाचे असतात.
तुरीच्या या व्हरायटीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी मर आणि वांझ या रोगांना चांगली प्रतिकारक आहे. याशिवाय शेंगा पोखरणाऱ्या आळी साठी देखील चांगली प्रतिकारक असून टपोरे दाण्यांच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे.