महाराष्ट्रमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभारणीसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आलेले असून प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत व यामध्ये रस्ते प्रकल्प खूप महत्वपूर्ण आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहराच्या कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रवासाचे अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे महामार्ग खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
तसेच अशा महामार्गामुळे औद्योगीकरण तसेच कृषी विकासाला गती मिळण्यासाठी देखील मदत होते. याच अनुषंगाने जर आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई व सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरांचा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. तसेच सायबर सिटी म्हणून गणल्या जाणाऱ्या नवी मुंबईला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
नुकत्याच नवी मुंबई व मुंबई या दोन्ही ठिकाणांना जोडण्यासाठी शिवडी ते न्हावा शेवा या सागरी सेतूची लोकार्पण झाले व त्या जोडीला त्या ठिकाणाहून पुणे शहराकडे देखील वेगात किंवा कमी वेळेत जाता येईल याकरिता एमएमआरडीच्या माध्यमातून देखील चिरले जंक्शन येथे आंतरमार्गीकांची कामे सुरू आहेत.
परंतु या व्यतिरिक्त आता ही दोन्ही शहरे जवळ यावी याकरिता नॅशनल हायवे अथॉरिटी अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यानुसार जेएनपीटी नजीकच्या पागोटे जंक्शन पासून ते मुंबई पुणे हायवे वरील चौक जंक्शन पर्यंत 29.15 किलोमीटर लांबीचा नवा सहा पदरी हरित मार्ग बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर या महामार्गाकरिता साधारणपणे 3010 कोटी छत्तीस लाख रुपये खर्च येणार आहे.
एनएचएआय उभारणार नवीन हरित महामार्ग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आता जेएनपीटी जवळ असलेल्या पागोटे जंक्शन ते मुंबई ते पुणे हायवे वर असलेल्या चौक जंक्शन या 29.15 किलोमीटर अंतरासाठी सहा पदरी नवीन असा हरित महामार्ग बांधण्यात येणार असून त्याकरिता ऑथॉरिटी कडून तीन हजार दहा कोटी छत्तीस लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
सध्या या हरित महामार्गाची निविदा प्रक्रिया नॅशनल हायवे अथोरिटी कडून सुरू करण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे या नवीन हरित महामार्गामुळे प्रस्तावित असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणे शहराच्या जास्तीत जास्त जवळ येणार असल्यामुळे येणाऱ्या काळात याचा खूप फायदा होणार आहे.
तसेच अटल सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही ठिकाणी जोडले गेले असून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कोकण हायवे मुळे गोवा राज्याच्या अंतर देखील या ठिकाणी दोन तासांनी कमी होणार आहे. सध्या या हायवेचे काम देखील विविध टप्प्यांमध्ये सुरू असून यातील महत्त्वाचा टप्पा हा रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील पुलाचा असून तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा अलिबाग ते मुंबई अंतर अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
या आंतरमार्गिकांची कामे ठरतील महत्वाची
जेव्हा अटल सेतू या सागरी पुलाचे लोकार्पण होणार होते त्या अगोदरच मुंबई गोवा हायवे आणि मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे सोबतच जुन्या मुंबई ते पुणे हायवे जोडता यावा याकरता एमएमआरडीच्या माध्यमातून चिरले येथे आंतरमार्गिकांचे कामे वेगात सुरू असून या कामांच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेएनपीए बंदरातून होणारी कंटेनर ट्रकच्या
वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चिरले टोकापासून ते गव्हाण फाटा आणि पळस्पे फाटा ते मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग पर्यंत 7.35 किलोमीटर लांबीचा एलिवेटेड कॉरिडॉर असून त्यावर 1351.73 कोटी रुपये खर्च होणार आहे.
खाजगीकरणातून उभारला जात आहे हा नवीन हरित मार्ग
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई व पुणे ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे जवळ आणण्याच्या दृष्टिकोनातून खाजगीकरणातून जेएनपीटी नजीकच्या पागोटे जंक्शन ते मुंबई पुणे हायवेवरील चौक जंक्शन पर्यंत 29.15 किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय आता घेण्यात आला असून त्याकरिता 3010 कोटी 36 लाख रुपये खर्च येईल अशी अपेक्षा आहे. जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा संबंधित कंत्राटदार याचा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करणार आहे.