Railway Travels Rules:- भारतीय रेल्वे हे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लांबच्या प्रवासाला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते व दररोज काही लाखोंच्या संख्येत प्रवासी हे रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात.
दररोज भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी मोठ्या संख्येने प्रवासी गाड्या चालवल्या जात असतात. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी जलद पोहचण्यासाठी रेल्वे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रवास करताना किंवा प्रवासासाठी रेल्वेची तिकीट बुक करताना साहजिकच रेल्वेचे देखील काही नियम आहेत व ते नियम पाळणे
व ते आपल्याला माहीत असणे देखील तितकेच गरजेचे आहे. आता रेल्वेचे तिकीट जर बुक करायचे असेल तर रेल्वे स्टेशनवर रांगेत उभे न राहता बरेच जण आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर किंवा एप्लीकेशनच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बुक करतात.
हे तिकीट बुक करताना जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्या सोबत आपल्या घरातील लहान मुले देखील असतात व अशावेळी कोणत्या वयापर्यंत मुलांना रेल्वेने फ्री मध्ये प्रवास करता येतो? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्या मनात येतो. त्यामुळे याबाबत रेल्वेचे देखील काही महत्त्वाचे नियम आहेत व ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
मुलांच्या बाबतीत मोफत रेल्वे प्रवासाबाबत रेल्वेचे नियम
1- नियम पहिला– जर मुलांच्या मोफत प्रवासाविषयी रेल्वेचा नियम पाहिला तर त्यांचे नियमानुसार एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना रेल्वेने मोफत प्रवास करता येतो.
2- नियम दुसरा- जर एखाद्या मुलाचे वय 5 ते 12 वर्षाच्या दरम्यान असेल व अशा मुलाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर या वयोगटातील मुलांसाठी तुम्ही जेव्हा तिकीट बुक कराल तेव्हा त्या मुलांसाठी रेल्वेत आरक्षित सीट नको असेल तर तुम्ही त्या मुलाचे अर्धे तिकीट खरेदी करू शकतात.
परंतु जर तुम्ही पाच ते बारा वर्षे वयोगटातील मुलाचे अर्धी तिकीट काढले तर मात्र त्यांना बसायला वेगळे सीट मिळत नाही. म्हणजेच अशा मुलांना प्रवास करताना तो त्यांच्या पालकांसोबत बसून करावा लागतो.
3- नियम तिसरा- समजा तुमच्या मुलाचे वय 5 ते 12 वर्षाच्या दरम्यान आहे व तुम्हाला असे वाटते की त्याने प्रवास करताना त्याकरिता स्वतंत्र बर्थ बुक करायचा.
तर मात्र अशा वेळी तुम्हाला त्या मुलाचे अर्धे तिकीट न घेता तुम्हाला पूर्ण तिकीट खरेदी करणे गरजेचे आहे. म्हणजेच अशावेळी तुम्हाला त्या वयाच्या मुलासाठी पूर्ण भाडे देणे गरजेचे राहिल.