Diesel Car care Tips:- आपण कुठलेही वाहन वापरतो तेव्हा त्या वाहनाची योग्य त्या प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे असते. वेळोवेळी त्याची देखभाल करणे तसेच इंजिन ऑइल बदलणे, तसेच मेन्टेनन्सशी संबंधित इतर सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही वेळेवर केल्या तर वाहनाची कंडिशन म्हणजेच त्याची स्थिती चांगली राहते
व अनावश्यक खर्च किंवा होणाऱ्या त्रासापासून आपल्याला वाचता येते. या अनुषंगाने बरीच वाहने ही पेट्रोल वर चालणारे असतात तर काही डिझेलवर चालणारे देखील असतात. डिझेलवर चालणाऱ्या कार वापराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून या डिझेलवर चालणाऱ्या कारची देखील योग्य त्या पद्धतीने काळजी घेणे खूप गरजेचे असते.
जर योग्य त्या पद्धतीने डिझेल कारची काळजी घेतली गेली नाही तर नुकसान होण्याची शक्यता वाढते. या अनुषंगाने जर तुमच्याकडे देखील डिझेलवर चालणारी कार असेल तर तिची काळजी कशी घ्यावी? याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.
डिझेलवर चालणाऱ्या कारची या पद्धतीने घ्या काळजी
1- वेळेवर सर्विसिंग करणे गरजेचे– इ
तर सगळ्या वाहनांप्रमाणेच डिझेल कारची देखील सर्विसिंग वेळेवर करणे गरजेचे आहे. इतर कोणत्याही वाहन किंवा कार प्रमाणेच डिझेल इंजन कारला देखील वेळेवर सर्विस करणे आवश्यक असते.
जर तुम्ही वेळेवर सर्विसिंग केली नाही तर कार खराब होण्याची शक्यता वाढते व नंतर दुरुस्तीसाठी जास्त खर्च येतो व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागतो.
2- डिझेल कारमध्ये कुलंट आवश्यक- डिझेल इंजिनचे कारचे इंजिन हे पेट्रोल इंजन कारपेक्षा तुलनेने जास्त गरम होते. याच कारणामुळे डिझेल इंजन असलेल्या कार मध्ये कुलंट गरजेचे असते.
कुलंटची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी व कारचे इंजिन जास्त गरम होऊ नये या पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. इंजिन थंड झाले तरी ते टॉप-अप केले पाहिजे.
3- इंधन फिल्टरची स्वच्छता- इंधन फिल्टरची वेळोवेळी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कारण इंजिन मध्ये जे काही डिझेल जात असते ते फिल्टर करणे हे इंधन फिल्टर चे काम असते व हे काम खूप महत्वपूर्ण आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही इंधन फिल्टर स्वच्छ केले नाही
तर डिझेलसह येणारा लहान कचरा देखील इंजिनपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढतो व त्यामुळे इंजिनचे इंटरनल नुकसान म्हणजेच अंतर्गत भागाचे नुकसान होऊ शकते व अंतर्गत भाग खराब होऊ शकतो. त्यामुळे इंधन फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे.
4- ऑइल बदलणे– डिझेल इंजन कार मधील ऑइल फिल्टर बदलत राहणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही इंजिन ऑइल बदलत असतात तेव्हा त्याचे फिल्टर देखील बदलणे गरजेचे आहे. ऑइलचे पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी वेळोवेळी ऑइल चेक करून ऑइल बदलणे महत्त्वाचे ठरते.