Money Tips: जेव्हा आपल्याला अचानकपणे पैशाच्या बाबतीत मोठी गरज उद्भवते तेव्हा अशावेळी आपण लागणारे पैशाची तजवीज ही मित्र किंवा नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेऊन करतो किंवा बँकेकडून कर्ज स्वरूपात पैसा उभा करण्यासाठी तरी प्रयत्न करत असतो.
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये सोने असते व या सोन्याचा वापर देखील अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांच्या उभारणीसाठी केला जातो. परंतु सोन्याच्या बाबतीत पाहिले तर यामध्ये आपण दोन पद्धतीने पैसा उभा करू शकतो.
त्यातील पहिली पद्धत म्हणजे आहे त्या सोन्यावर कर्ज घेणे म्हणजेच गोल्ड लोन घेणे व दुसरा पर्याय म्हणजे सोने विकून पैसा उभा करणे. परंतु जर या दोन्ही पद्धतींचा तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर सोन्यावर कर्ज म्हणजेच गोड लोन घेणे फायद्याचे राहील
की सोने विकून पैसा उभा करणे फायद्याचे राहते या दृष्टिकोनातून देखील विचार होणे तितकेच गरजेचे आहे. याच मुद्द्याला धरून आपण काही महत्त्वाची माहिती या लेखात घेणार आहोत.
गोल्ड लोन घ्या परंतु या गोष्टी वाचा
1- जेव्हा आपण गोल्ड लोन घ्यायला जातो तेव्हा आपण बँकेकडे सोने तारण ठेवत असतो. या तारण ठेवलेल्या सोन्याची जी काही किंमत म्हणजेच बाजार मूल्य असते
त्या मूल्याच्या एकूण 75 टक्के रक्कम आपल्याला कर्ज म्हणून दिले जाते. परंतु उरलेली ती जी काही 25 टक्क्यांची रक्कम असते ती बँकेकडे राहते व त्याचा आपल्याला कुठल्याही पद्धतीचा फायदा होत नसतो.
2- तसेच बँकेकडे सोन दिल्यानंतर त्या सोन्याचे जे काही बाजार मूल्य असते ते बँकेचे तज्ञांच्या माध्यमातून ठरवले जाते व ते ठरवताना नेमके कोणते निकष वापरले जातात हे आपल्याला सांगितलं देखील जात नाही.
यामध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता राहत नाही. जे आपल्या सोन्याला बँकेने जे काही बाजारमूल्य ठरवलेले आहे तेच स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो.
3- तसेच आपण जेव्हा गोल्ड लोन घेतो तेव्हा आपण सोन तारण देत असतो व ते गोल्ड लोन फेडण्यासाठी काही ठराविक मुदत आपल्याला बँकेने दिलेली असते व त्या मुदतीत असते गोल्ड लोन फेडणे गरजेचे असते.
परंतु काही कारणास्तव जर गोल्ड लोन फेडणे शक्य झाले नाही तर बँकेच्या माध्यमातून त्या ठेवलेल्या सोन्याचा लिलाव केला जातो बँक कर्ज वसूल करून घेते.
4- गोल्ड लो मध्ये आपण जितके सोन्याच्या बदलांमध्ये पैसे घेतो त्यापेक्षा आपण त्यावर अतिरिक्त व्याजाचे पैसे भरतो. परंतु काही कारणास्तव एखाद्या वेळेस तरी देखील आपल्यावर सोने गमावण्याची वेळ येऊ शकते.
गोल्ड लोनपेक्षा सोने विकून पैसे उभारले तर मिळतात हे फायदे
1- जर आपण गोल्ड लोन घेण्याऐवजी जर सोने विकले तर याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सोन्याचे जे काही बाजार मूल्य असते तेवढे सगळे पैसे आपल्याला मिळतात.
2- गोल्ड लोनमध्ये आपल्याला व्याजापोटी जी काही रक्कम द्यावी लागते ती रक्कम आपल्याला सोने विकल्यावर द्यावी लागत नाही.
3- समजा तुम्ही तुमचे सोने विकले व त्यातून पैसा उभा केला व त्याचा जर वापर व्यवस्थित वापर केला तर त्यामाध्यमातून आपण पुन्हा नव्याने सोने खरेदी करू शकतो व पूर्वीच्या दागिन्यांसारखेच दागिने परत बनवू शकतो.
गोल्ड लोन घेण्याची वेळ येऊ नये म्हणून काय करावे?
पैशांची तातडीची निकड निर्माण झाली तेव्हा आपण गोल्ड लोन घेत असतो. परंतु त्याऐवजी जर आपल्यावर गोल्ड लोन घेण्याची वेळ येऊच नये यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण जो काही पैसा कमवतो
त्याची वेळच्या वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली आणि नको ते खर्च टाळले तर गोल्ड लोन घेण्याची वेळ आपल्यावर येत नाही किंवा आपल्याला ती टाळता येऊ शकते. परंतु तरी देखील अशी वेळ जर आली तर गोल्ड लोन घेणे सरळ टाळावे व सोने विकून पैसे उभे करावे हेच आपले फायद्याचे राहील.