Sonalika Tiger 47 Tractor: सोनालिकाचे ‘हे’ ट्रॅक्टर आहे शेतीतील असली टायगर! वाचा 50 HP मधील या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
sonalika tiger 47 tractor

Sonalika Tiger 47 Tractor:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागले असून आता अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु सगळ्या यंत्रांमध्ये ट्रॅक्टरचा वापर शेतकरी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर करत असतात.

शेतीमध्ये इतर जे काही यंत्र विकसित झाली त्यातील बहुसंख्य यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्त्व हे शेतीसाठी अनन्यसाधारण असे आहे. तसेच शेतीच्या संबंधित आधुनिक अवघड कामे देखील ट्रॅक्टरचे साह्याने सहजपणे पूर्ण करता येतात.

त्यामुळे कुठलाही शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असेल तर तो पावरफूल अशा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतो. त्यामुळे याच दृष्टिकोनातून आपण या लेखात सोनालीका टायगर 47 या ट्रॅक्टरची माहिती बघणार आहोत जे अतिशय पावरफूल ट्रॅक्टर म्हणून ओळखले जाते.

 सोनालीका टायगर 47 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 सोनालिकाच्या या टायगर सिरीज मधील ट्रॅक्टरमध्ये 3065 सीसीचे तीन सिलेंडर मध्ये कुलंट कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे व ते 50 एचपी पावरसह 205 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या ट्रॅक्टरला ड्राय टाईप इयर फिल्टर देण्यात आले असून यामुळे इंजिनचे धुळीपासून संरक्षण होते.

या सोनालीका ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 43 एचपी आहे व त्याचे इंजिन 1900 आरपीएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता दोन हजार किलो इतकी ठेवण्यात आली आहे. या ट्रॅक्टरला 65 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेली आहे.

तसेच सोनालिका टायगर 47 ट्रॅक्टर मध्ये पावर स्टेरिंग देण्यात आलेली असून आठ फॉरवर्ड+ दोन रिव्हर्स गियर सह गिअरबॉक्स देण्यात आला आहे. टायगर सिरीजचा हा ट्रॅक्टर जास्तीत जास्त 39 किमी प्रति तास वेगाने पुढे जातो.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला एकच क्लच पाहायला मिळतो आणि त्यात साईड शिफ्टर प्रकारच्या ट्रान्समिशनसह कॉन्स्टंट मेश आहे. तसेच यामध्ये रिव्हर्स पिटीओ प्रकारचा पावर टेकऑफ पाहायला मिळतो जो 540 आरपीएम जनरेटर करतो. हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो.

 किती आहे सोनालीका टायगर 47 ची किंमत?

 सोनालिका टायगर 47 ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत सात लाख 27 हजार ते सात लाख 59 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली असून या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी

आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे बदलू शकते. तसेच कंपनी तिच्या सोनालीका टायगर 47 ट्रॅक्टर वर 5000 तास किंवा पाच वर्षाची वारंटी देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe