Cow Rearing:- संपूर्ण भारतामध्ये पशुपालन व्यवसाय पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून या माध्यमातून गाय आणि म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामध्ये दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांकडून जास्त दूध देणाऱ्या दर्जेदार आणि जातिवंत गाय व म्हशीची निवड यासाठी केली जाते.
जर आपण भारतातच नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. अनेक प्रकारच्या संकरित आणि देशी गाईंचे पालन शेतकरी बंधू करत असतात. परंतु गाईंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कमीत कमी चारा खाऊन जास्त दूध देणारी गाय कोणती?
हा प्रश्न कित्येक जणांच्या मनात आला असेल. तर त्याचे उत्तर जर आपण पाहिले तर ते आहे साहीवाल या जातीची गाय होय. हे गाय कमी चाऱ्यात अधिक दूध देणारी गाय म्हणून ओळखली जाते व उत्तर भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये या गाई मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात.
गायचे योग्य व्यवस्थापन केल्यास दररोज देऊ शकते 30 ते 40 लिटर दूध
आपण साहीवाल गायीचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश, पंजाब व हरियाणा राज्यात या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर होते. साधारणपणे या गाईचे दूध उत्पादन क्षमता पाहिली तर ती दररोज दहा ते पंधरा लिटर इतकी आहे.
परंतु जर योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतली तर ही गाय दररोज 30 ते 40 लिटर देखील दूध देण्यास सक्षम आहे. तसेच साहिवाल या गाईचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी जागेत आणि कमीत कमी चाऱ्यात या गाईचे व्यवस्थापन करता येते.
साहिवाल गायीच्या दुधासाठी पंजाब राज्याने बनवली वेगळी योजना
जर आपण पंजाब या राज्याचा विचार केला तर या ठिकाणी साहिवाल या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर होते. यामागील प्रमुख कारणच हे आहे की ते कमीत कमी चारा खातात व जास्तीत जास्त दूध देण्यासाठी सक्षम आहेत. तसेच या गाईच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील भरपूर असते व अनेक आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी हे दूध चांगले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त साहिवाल गाईचे पालन करणे गरजेचे आहे. जेणेकरून या गाईंचे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे आता दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर हे दूध वेगळ्या पद्धतीने पॅकिंग केले जाण्याचा पंजाब सरकारचा उद्देश आहे.
म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून या जातीच्या गायीच्या दुधामध्ये कोणत्याही इतर जातीच्या गायीच्या दुधाची भेसळ न करता नागरिकांना साहिवाल गायीचे शुद्ध दूध मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे.