Massey Ferguson 5225: परवडणाऱ्या किमतीत मिळेल मॅसी फर्ग्युसनचा ‘हा’ मिनी ट्रॅक्टर! वाचा या ट्रॅक्टरची किंमत आणि महत्त्वाची वैशिष्ट

Ajay Patil
Published:
messey ferguson tractor

Massey Ferguson 5225:- शेतीकामासाठी अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि किमतींमधील ट्रॅक्टर निर्मिती करण्यात येते व यामध्ये मिनी ट्रॅक्टर देखील मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहे.

मिनी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर फळ पिकांमधील अंतर मशागतीसाठी व इतर महत्वाच्या कामासाठी केला जातो. अनेक शेतकरी पॉवरफुल आणि कमी किमतीत मिळेल अशा मिनी ट्रॅक्टरच्या शोधात असतात.

जर तुम्हाला देखील शेतीसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तुम्ही मॅसी फर्ग्युसन 5225 ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी सिद्ध होऊ शकतो.

 मॅसी फर्ग्युसन 5225 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 या ट्रॅक्टरमध्ये 1290 सीसी क्षमतेसह दोन सिलेंडरमध्ये शक्तिशाली इंजिन पाहायला मिळते व ते 24 एचपी पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे एअर फिल्टर देण्यात आले असून या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते.

कंपनीचा हा मिनी ट्रॅक्टर 23.55 किमी प्रतितास फॉरवर्ड स्पीडसह येतो. या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता 750 किलो असून या ट्रॅक्टरचे एकूण वजन 1115 किलोग्रॅम इतके आहे. या ट्रॅक्टरची लांबी 2770 एमएम व रुंदी 1085 एमएम इतकी आहे. तसेच यामध्ये मॅन्युअल स्टेरिंग देण्यात आलेली असून

जी स्मूथ ड्राईव्ह पुरवते. कंपनीचा हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड+ दोन रिवर्स गियरसह गिअर बॉक्समध्ये येतो. या ट्रॅक्टरमध्ये सिंगल ड्राय फ्रिक्शन प्लेट क्लच देण्यात आला आहे.

या ट्रॅक्टरमध्ये 27.5 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. तसेच याशिवाय यामध्ये मल्टी डिस्क ऑइल एमर्स ब्रेक्स देण्यात आले असून टायरवर चांगली पकड ठेवण्यासाठी ते सक्षम आहे. हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्ह सह येतो.

 किती आहे मॅसी फर्ग्युसन 5225 ट्रॅक्टरची किंमत?

 जर आपण या ट्रॅक्टरच्या भारतातील किमतीचा विचार केला तर भारतात याची किंमत 3 लाख 95 हजार ते चार लाख 28 हजार( एक्स शोरूम) इतके ठेवण्यात आली असून याची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे बदलू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe