Gas Cylinder Tips:- सध्या जर आपण प्रत्येक घराच्या स्वयंपाक घर पाहिले तर आता मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर हा स्वयंपाकासाठी केला जातो. अगदी ग्रामीण भागात असो की शहरी भाग यामध्ये आता गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. गॅसचा वापर स्वयंपाकासाठी होत असल्यामुळे आता अनेक दृष्टिकोनातून महिला वर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
परंतु जर आपण एक गॅस सिलेंडरच्या बाबतीत प्रत्येकाला येणारी एक प्रमुख समस्या पाहिली तर गॅस सिलेंडर अचानकपणे संपणे. कारण बऱ्याचदा घरी पाहुणे वगैरे आलेले असतात व अशावेळी रात्री-बेरात्री स्वयंपाक करताना अचानकपणे गॅस संपतो
व मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. कारण आपल्याला गॅस सिलेंडर मध्ये गॅस किती शिल्लक आहे हे कळत नसल्यामुळे ही समस्या प्रामुख्याने उद्भवते. अशावेळी आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपल्याला जर कळले की सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? तर किती छान होईल. याच संबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
ही ट्रिक्स वापरा आणि सिलेंडर मधील शिल्लक गॅस तपासा
सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही. हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक कापड घ्यावा लागेल व त्याला पाण्यात भिजवून घ्या.
पाण्यामध्ये व्यवस्थित तो कापड भिजवल्यानंतर किचनमध्ये असलेल्या सिलेंडरच्या आजूबाजूला त्याला ठेवा किंवा त्याला गुंडाळा. म्हणजेच काही मिनिटांपर्यंत एक ओला कापड सिलेंडरला गुंडाळून ठेवणे गरजेचे आहे. काही वेळानंतर हा ओला कापड काढून घ्यावा.
त्यामध्ये सिलेंडरचे व्यवस्थित निरीक्षण करावे. सिलेंडरचा काही भाग चुकला असेल आणि काही भाग ओला राहिलेला दिसेल. यामध्ये सिलेंडरचा जो भाग सुकला असेल तिथल्या भागातील गॅस संपला आहे हे समजावे. उलट सिलेंडरचा जो भाग ओला आहे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ओलसरपणा दिसत आहे त्या ठिकाणी गॅस आहे
व तो भाग सुखायला निश्चितच जास्त कालावधी लागतो. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या आणि साध्या या ट्रिक्सने तुमच्या सिलेंडर मधील शिल्लक गॅस तपासू शकतात व अचानकपणे गॅस संपण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळवू शकतात.