Ear Tagging: 31 मार्च 2024 पर्यंत जनावरांना इयर टॅगिंग करणे बंधनकारक! नाहीतर…..

Ajay Patil
Published:
ear tagging

Ear Tagging:- भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय केला जातो. बऱ्याच वर्षांपासून जर आपण पाहिले तर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. पशुपालन व्यवसायामध्ये सगळ्यात महत्व हे जनावरांच्या आरोग्याला असते.

कारण जनावरांचे आरोग्य उत्तम असेल तरच पशुपालन व्यवसाय हा यशस्वी होतो. पशुपालन व्यवसाय हा प्रामुख्याने दुधाच्या उत्पादनाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर केला जातो व दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असतो. त्यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम ठेवणे खूप गरजेचे असते.

याकरिता सरकारच्या माध्यमातून देखील पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनावरांच्या आरोग्याच्या संबंधित समस्या निर्माण होऊ नये त्याकरिता अनेक उपाययोजना केल्या जातात. यातीलच एक प्रयत्न म्हणून आपण महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा

विचार केला तर आता पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या कानावर शिक्के म्हणजेच इयर टॅगिंग करणे 31 मार्च पर्यंत बंधनकारक करण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर आत्ता  जनावरांची भारत पशुधन प्रणालीवर नोंद करणे देखील गरजेचे आहे व कानावर शिक्के म्हणजेच इअर टॅगिंग करणे देखील गरजेचे आहे.

 काय असते नेमके इयर टॅगिंग?

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे व या प्रणालीमध्ये बारा अंकी बारकोडेड असलेला इअर टॅगिंग केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत.

यामुळे आता जनावरांच्या जन्म मृत्यूची नोंदणी तसेच प्रतिबंधात्मक औषध उपचार, लसीकरण तसेच वंध्यत्व उपचार, जनावरांच्या खरेदी विक्रीची माहिती इत्यादी आता ताबडतोब उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या इयर टॅगिंगचे महत्व अनन्यसाधारण आहे.

याद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे आता शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना तसेच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच या माध्यमातून जी काही नोंदणी होईल त्यामुळे जनावरांमध्ये असलेल्या विविध आजारांची आधीच माहिती मिळाल्यामुळे संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यास देखील मदत होणार आहे व जनावरांची जीवित हानी टाळता येणार आहे.

 31 मार्चपर्यंत जनावरांना इयर टॅगिंग केले नाहीतर

जनावरांना त्यामुळे आता 31 मार्चपर्यंत इयर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यासोबतच भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे देखील गरजेचे आहे.

पशुपालकांनी त्यांच्या जनावरांसाठी या वरील बाबी एक जून 2024 पर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर अशा कोणत्याही जनावरांचे राज्यांमध्ये खरेदी विक्री करता येणार नाही.तसेच जनावरांना कुठल्याही प्रकारचा उपचार देखील दिला जाणार नाही अशी देखील माहिती पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

जर इयर टॅगिंग शिवाय जनावरांची वाहतूक केली तर संबंधित वाहतूकदार व जनावरांच्या मालकांवर कारवाई होणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा विजेचा धक्का लागला किंवा एखाद्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे जनावर मृत्युमुखी  पडले आणि अशा जनावराला जर इयर टॅगिंग केली नसेल तर जनावराच्या मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही.

तसेच जनावरांच्या विक्रीकरिता वाहतूक करताना जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त आरोग्य प्रमाणपत्र वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जनावरांना इयर टॅगिंग करून घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe