MG Hector Car:- बाजारामध्ये सध्या अनेक SUV कार सादर केल्या जात असून यामध्ये मारुती तसेच टाटा आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यासोबतच आता एमजी मोटर इंडियाने देखील एसयुव्ही हेक्टरचे दोन नवीन व्हेरियंट बाजारामध्ये सादर केले असून नक्कीच हे दोन्ही व्हेरियंट आता टाटा आणि मारुतीच्या कारला टक्कर देतील अशी स्थिती आहे.
या नवीन एमजी हेक्टरचे शाईन प्रो आणि सिलेक्ट प्रो असे दोन प्रकार सादर केले असून यामध्ये सुरक्षितता तसेच ड्रायव्हिंग आणि अनेक नवनवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व आरामदायी ड्रायव्हिंग इत्यादी वैशिष्ट्यांचा देखील समावेश या नवीन एसयूव्ही हेक्टरच्या दोनही प्रकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
एमजी हेक्टरच्या दोन्ही प्रकारांमधील वैशिष्ट्ये
एमजी हेक्टरच्या शाईन प्रो आणि सिलेक्ट प्रो या दोन्ही प्रकारांमध्ये अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असून यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले तसेच वायरलेस फोन चार्जर सह 14 इंचाची मोठी एचडी पोट्रेट इन्फोटेनमेंट प्रणाली देखील देण्यात आलेली आहे. त्याच्या नवीन प्रकारांमध्ये फ्लोटिंग लाईट टर्न इंडिकेटर,
एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी ब्लेड कनेक्टेड टेल लॅम्प आणि क्रोम बाहेरील दरवाजाचे हँडल यासारखे अनेक वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये मेटल फिनिश असलेली ऑल ब्लॅक कॅबिन देण्यात आलेली असून लेदरने झाकलेली म्हणजेच लेदर रॅपड स्टेरिंग व्हील देण्यात आलेली आहे.
तसेच एमजी हेक्टरचे हे दोन्ही प्रकार 17.78 cm एम्बेडेड एलसीडी स्क्रीन सह डिजिटल क्लस्टरसह येतात. तसेच स्मार्ट की सोबतच पुश बटन इंजिन स्टार्ट/ स्टॉप वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले असून डिजिटल ब्लूटूथ की आणि की शेअरिंगची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. एवढेच नाहीतर या दोन्ही प्रकारांमध्ये क्रूज कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, डिस्क ब्रेक तसेच ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल आणि एबीएस + ईबीडी सह ब्रेक असिस्ट इत्यादी वैशिष्ट्ये देखील आहेत.
कसे देण्यात आले आहे इंजिन?
एमजी हेक्टर पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध असून या एसयुव्ही करिता इंजिन पर्यायांमध्ये 1.5 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल मोटर समाविष्ट आहे व ती मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. सोबतच 2.0 लिटर टर्बोचार्जेड डिझेल युनिट मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.
किती आहे किंमत?
एमजी हेक्टरच्या शाईन प्रो या व्हेरियंटची किंमत 16 लाख रुपये( एक्स शोरूम) असून सिलेक्ट प्रो व्हेरिएंटची किंमत 17 लाख 30 हजार रुपये( एक्स शोरूम) इतकी ठेवण्यात आलेली आहे.