शेतात एकदाच करा ‘या’ हिरव्या सोन्याची लागवड अन कमवा 30 वर्षापर्यंत पैसा! जाणून घ्या सविस्तर

Ajay Patil
Published:

निसर्गाचा लहरीपणा आणि वारंवार येणाऱ्या अवकाळी तसेच गारपीटीसारखे संकट यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेतच. परंतु आर्थिक दृष्ट्या देखील मोठ्या प्रमाणावर खालवल्याची स्थिती आहे. अगदी शेती उत्पादन हातातोंडाशी येते व तेव्हाच निसर्गाची अवकृपा होते व सगळे काही हिरावून नेले जाते.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी परिस्थितीनुसार शेतीमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे व शेतकरी तो बद्दल करत आहेत. या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पिक पद्धतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. नुसते पारंपारिक पिके न घेता किंवा भाजीपाला किंवा फळबाग  न घेता थोडे जास्त शेतीचे क्षेत्र असेल तर सागवान किंवा महोगणी आणि

बांबू सारख्या झाडांची लागवड करून कमीत कमी खर्चामध्ये दीर्घकाळापर्यंत निश्चित आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत तयार करता येतो. यामध्ये तुम्हाला नैसर्गिक आपत्तीचा देखील फटका बसण्याची शक्यता खूपच कमीत कमी आहे. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण बांबू लागवड व त्याविषयीची काही महत्वपूर्ण माहिती थोडक्यात बघणार आहोत.

 बांबू लागवड का आहे फायद्याची?

बांबूला हिरवे सोने म्हणतात व यामागील कारणे देखील तसेच आहेत.  जर आपण सध्या बांबूच्या मागणीची स्थिती पाहिली तर त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला घराचे बांधकाम करायचे असेल त्यासाठी व बांबू पासून तयार केल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू, फर्निचर,

बांबूच्या कोंबापासून तयार करण्यात येणारे लोणचे आणि कागद निर्मिती याकरिता बांबूला वर्षभर चांगल्या पद्धतीची मागणी असते. तसेच अलीकडच्या कालावधीमध्ये बांबूचा वापर हा इथेनॉल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे व भविष्यामध्ये बांबूपासून जास्त प्रमाणात इथेनॉल निर्मिती करण्याचा उद्देश असल्याने बाबूच्या मागणीत लक्षणीय वाढ होऊ शकते.

 इतर पिकांपेक्षा बांबू लागवडीचा खर्च नगण्य

जर आपण इतर पिकांच्या तुलनेत पाहिले तर बांबू लागवडीचा खर्च खूप कमी आहे. शेतकरी बांधांवर देखील बांबूची लागवड करू शकतो किंवा क्षेत्र जास्त असेल तर बांबूची शेती देखील करू शकतो. तुम्ही अगदी मुरमाड, पानथळ किंवा काळ्या जमिनीमध्ये देखील बांबूची लागवड करू शकतात. एका हेक्टरमध्ये पाच बाय चार मीटर अंतराने लागवड करण्याकरिता साधारणपणे सहाशे बांबूची रोपे लागतात.

याकरता जर तुम्ही टिशू कल्चर रोपांचा वापर केला तर 25 रुपयापर्यंत एक रोप तुम्हाला मिळते. तसेच या रोपांकरिता तुम्हाला 50 ते 80% पर्यंत अनुदान देखील शासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे लागवड खर्च हा बऱ्यापैकी कमी होतो. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रोपांची लागवड व त्याकरिता आवश्यक मशागत आणि खते, लागणारे मनुष्यबळ याकरिता पहिल्या वर्षी खर्च करण्याची गरज भासते

परंतु त्यानंतर मात्र 35 वर्षापर्यंत तुम्हाला लागवडीचा खर्च हा महत्त्वाचा असतो व पुन्हा खर्च करायची गरज भासत नाही. तसेच याकरिता तुम्हाला अगोदरची दोन वर्ष पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. नंतर मात्र गरजेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. इतर पिकांपेक्षा बांबूला खूप कमी पाणी लागते.

 बांबूपासून किती मिळू शकते आर्थिक उत्पन्न?

एकदा लागवड खर्च केला की तीस वर्षांपर्यंत तुम्हाला लागवडीचा खर्च यामध्ये करावा लागत नाही. बांबूचे एकदा तुम्ही लागवड केली की तीन ते चार वर्षानंतर ते उत्पादन द्यायला सुरुवात करते. समजा एक एकर क्षेत्रामध्ये तुम्ही बांबू लावला आहे व या माध्यमातून तुम्हाला एकरी सुरुवातीला 800 ते 900 बांबूंचे उत्पादन निघू शकते.

जरी बाजारामध्ये 70 ते 100 रुपयापर्यंत जरी एक बांबू गेला तरी त्यानुसार वर्षाला हेक्टरी दोन ते अडीच लाखांचे उत्पादन मिळते. यामध्ये जमेची गोष्ट म्हणजे आता सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

 शासनाच्या अनुदान उपलब्ध

अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून बांबू शेती करण्यासाठी रोपांची उपलब्धता तसेच मार्गदर्शन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये जर अनुदानाचे स्वरूप बघितले तर टिशू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रोपांची जी किंमत आहे

त्या किमतीवर चार हेक्टरच्या आतील लागवडीकरिता 80%  तर चार हेक्टर पुढील लागवड करायची असेल तर 50% अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते व या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही वन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe