Corn Crop Cultivation: ‘या’ गोष्टींची काळजी घेऊन उन्हाळी हंगामात करा मक्याची लागवड! मिळेल बंपर उत्पादन व नफा

Ajay Patil
Published:

Corn Crop Cultivation:- मक्याची लागवड प्रामुख्याने संपूर्ण भारतात केली जाते व महाराष्ट्रात प्रामुख्याने खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मक्याची लागवड होत असते. सध्या मक्याचा वापर व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे सध्या बाजार भाव देखील मक्याला चांगले मिळताना दिसून येत आहेत.

तसेच इथेनॉल निर्मितीमध्ये मक्याचा वापर करण्याचे धोरण सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्यामुळे देखील मक्याचे बाजार भाव यापुढील काळात देखील चांगलेच राहतील अशी शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी मका लागवड करून भरघोस उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. उन्हाळी हंगामामध्ये जर मक्याचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केले तर गहू किंवा इतर पिकांपेक्षा ते जास्त उत्पादन देऊ शकते व आर्थिक नफा देखील इतर पिकांपेक्षा यातून जास्त मिळू शकतो.

या छोट्या परंतु महत्वाच्या गोष्टीची घ्या काळजी, मिळेल मक्याचे बंपर उत्पादन

1- पेरणीची योग्य वेळ– कुठलाही पिकासारखेच मक्याची पेरणी किंवा लागवडीचा वेळ उत्तम साधणे खूप गरजेचे आहे. योग्य वेळेला केलेली पेरणी मक्याच्या उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. सहसा मे ते जून महिन्यात मक्याची लागवड उन्हाळ्या हंगामासाठी करतात.

2- दर्जेदार बियाण्याची निवड– मक्याचे भरपूर आणि दर्जेदार उत्पादन हवे असेल तर लागवडीसाठी दर्जेदार बियाण्याची निवड करणे गरजेचे आहे.

3- सिंचनाची काळजी घ्यावी- पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचे असून याचा थेट परिणाम हा मका पिकाच्या उत्पादकतेवर होत असतो. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा पोत आणि पिकाची गरज ओळखून वेळोवेळी पाण्याचे व्यवस्थापन करावे.

4- खते व कीटकनाशक- जमिनीची पोषणमूल्यता व पिकाची गरज ओळखून योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे तसेच किड व रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीटकनाशकांचा योग्य वापर करावा.

5- तंत्रज्ञानाचा वापर- तसेच मक्याचे उत्पादन जास्तीत जास्त यावे याकरिता तुम्ही मका पिकाच्या बाबतीतले नवनवीन तंत्रज्ञान आणि सुधारित पद्धतींचा वापर करू शकतात. यामुळे देखील उत्पादकता वाढण्यास मदत होते.

6- रोग व कीड व्यवस्थापन- पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून येणाऱ्या रोग व किडींपासून बचाव करण्याकरिता आवश्यक ते व्यवस्थापनाच्या पद्धती अवलंबाव्या.
7- बाजारपेठेचा अभ्यास- मक्याच्या तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील मागणी आणि किंमत याचा विचार करूनच विक्री नियोजन करावे.

मक्याच्या काही महत्त्वाच्या जाती
1- सुपर स्वीट कॉर्न- हे वाण स्वीट कॉर्न साठी चांगले असून त्याची चव गोड असते व दाण्याचा आकार मोठा असतो. त्यामुळे या जातीच्या मक्याला चांगली मागणी असते.

2- फिल्ड कॉर्न- हेदेखील मक्याचे एक चांगले बियाणे असून उन्हाळ्या हंगामासाठी हे उत्तम मक्याचे उत्पादन देऊ शकते. अगदी कठीण परिस्थितीमध्ये देखील चांगले उत्पादन देण्यासाठी फिल्ड कॉर्न हे बियाणे सक्षम आहे.

3- संकरित मका बियाणे- तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या संकरित मक्याच्या बियाण्याची लागवड करून तुम्ही उच्च उत्पादकता आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळवू शकतात व उत्पादन देखील वाढवू शकतात.

4- ब्युटी कॉर्न- हे एक स्वीट कॉर्न मक्याचे वाण असून हे खायला देखील अतिशय स्वादिष्ट आहे व दिसायला आकर्षक दिसते. बाजारपेठेत याला चांगली मागणी असते.

5- विंटेज कॉर्न- हे बियाणे उन्हाळ्याच्या हवामानामध्ये देखील चांगले उत्पादन देऊ शकते. या जातीच्या मक्याचे व्यवस्थापन करताना तुमच्या स्थानिक पातळीवरील हवामानाची स्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही कृषी विभाग किंवा तज्ञांकडून सल्ला घेऊन जर विंटेज कॉर्न या वाणाच्या मक्याचे व्यवस्थापन केले तर भरघोस उत्पादन मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe