Health Information:- मानवी शरीर खूप गुंतागुंतीचे असून यामधील प्रत्येक अवयव आणि प्रत्येक पार्ट हा उपयोगाचा आहे. प्रत्येक अवयवांचे कार्य एकमेकांशी निगडित असल्यामुळे एखाद्या अवयवावर थोडा जरी काही बिघाड झाला किंवा काही समस्या आली तरी त्याचा संपूर्ण परिणाम हा शरीरावर दिसून येतो.
शरीरातील प्रत्येक अवयव त्यांचे काम व्यवस्थित रीतीने करत राहणे खूप गरजेचे आहे व ते निरोगी शरीरासाठी आवश्यक देखील आहे. प्रामुख्याने शरीरातील जर आपण प्रमुख अवयव पाहिले तर यामध्ये किडनी तसेच लिव्हर अर्थात यकृत, फुफ्फुस आणि सगळ्यात महत्त्वाचे अवयव म्हणजे हृदय हे असते.
त्यामुळे या सगळ्या अवयवांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे खूप गरजेचे असते. या अवयवांमध्ये जर आपण किडनी अर्थात मूत्रपिंडांचा विचार केला तर शरीरामध्ये दोन किडनी असतात. किडन्या या शरीराच्या निरोगी राखण्याकरिता खूप महत्त्वाचे भूमिका पार पाडतात.
शरीरातील जे काही निरुपयोगी घटक आहेत ते काढून टाकण्याचे महत्त्वपूर्ण कार्य किडनीच्या माध्यमातून पार पाडले जाते. तसेच शरीरातील अतिरिक्त साखर किंवा इतर नुकसानदायक रसायने देखील किडनीच्या माध्यमातून फिल्टर केले जातात व रक्त शुद्ध राहते.
त्यामुळे दोनही किडन्या निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. परंतु जर काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीची एक किडनी खराब झाली तर दुसऱ्या किडनीवर साहजिकच कामाचा ताण पडणार हे मात्र निश्चित.
अशावेळी आपल्यासारख्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की एक किडनी खराब झाली तर दुसरी किडनीच्या साह्याने व्यक्ती किती दिवस आयुष्य जगू शकतो? याबाबतीतलेच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
काय म्हणतात याबाबत तज्ञ?
जर आपण डॉक्टर आणि तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची एक किडनी खराब झाली किंवा त्याने दान केली तर साहजिकच एका किडनीला जास्त काम करावे लागते व अशावेळी दुसरी किडनी आपली कार्यक्षमता वाढवते.
त्यामुळे शरीर योग्यरीत्या कार्य करते व व्यक्ती आरामात जीवन जगू शकते. तसेच या बाबतीत तज्ञांचे आणखी एक मत असे आहे की काही लोकांमध्ये असे घडते की त्यांच्या शरीरात त्यांचा जन्म झाल्यापासून फक्त एकच किडनी काम करते.
तरीपण अशा लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. जेव्हा एखादी दाता किडनी दान करतो तेव्हा त्याला काही महिन्यानंतर पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ वाटू लागते. परंतु तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना स्वतःच्या डेली रुटीन आणि आहार ठेवावा लागतो.
किडनी दान केल्यानंतर संबंधित दात्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून झालेली शस्त्रक्रिया लवकर बरी होऊ शकेल व उरलेली किडनीला पुरेसा सपोर्ट आणि तिची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तिला वेळ मिळेल.
रक्तदान केल्यानंतर दुसऱ्या किडनीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते व ती आधी पेक्षा जास्त वेगाने काम करायला लागते. किडनी जर दान केली तर मात्र काही महिने जास्त काळजी घेणे गरजेचे असते व एक ते दोन वर्षांपर्यंत नियमितपणे तपासणी करावी लागेल.