Reduce Electricity Bill Tips: उन्हाळ्यामध्ये ‘या’ छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी करा आणि विजबिल कमी करा! होईल पैशांची बचत

Ajay Patil
Published:
reduce electricity bill tips

Reduce Electricity Bill Tips:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू झाला असून हळूहळू कमाल तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये अंगाची लाही लाही करणारा उकाडा सर्वांना त्रस्त करेल यात मात्र शंका नाही.

यामुळेच उन्हाळ्यामध्ये या उकाड्यापासून  वाचण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो व या प्रयत्नांचाच भाग म्हणून घरामध्ये एअर कंडिशनर, पंखे, कुलर्स इत्यादी विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

त्यामुळे साहजिकच या उपकरणांचा वापर जास्त होत असल्याने विजेचा वापर देखील वाढतो व परिणामी महिन्याच्या येणाऱ्या बिलामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते व वाढीव वीज बिलामुळे आपल्या खिशाला कात्री बसते.

परंतु तुम्हाला जर वीज बिल कमी करायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली  तर महिन्याला येणाऱ्या वाढीव वीज बिलापासून  तुम्ही सुटका मिळवू शकतात. यासंबंधीची माहिती या लेखात घेऊ.

 या छोट्या गोष्टींची काळजी घ्या आणि विज बिल कमी करा

1- स्विच ऑफ करायला विसरू नका आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की जेव्हा आपण काम संपल्यावर खोलीच्या बाहेर निघतो तेव्हा खोलीतील लाईट किंवा इतर ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात त्यांचे स्विच ऑफ करायला विसरून जातो किंवा ते बंद करत नाहीत.

परंतु असे न करता खोलीमधील किंवा घरामधील फोनचे चार्जर तसेच लॅपटॉप किंवा इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर होत नसेल तर त्यावेळी स्विच बंद करणे गरजेचे आहे.

कारण अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा स्विच ऑन राहिला तरी विज बिल येत जातं. मोबाईल चार्ज वगैरे झाल्यानंतर चार्जरचे बटन बंद करायला विसरू नका.

2- घरातील बल्ब बदला जे पारंपारिक म्हणजे ट्रेडिशनल बल्ब असतात त्यांना वीज जास्त प्रमाणात लागते. त्या तुलनेमध्ये एलईडी लाईट बल्ब मोठ्या प्रमाणावर विजेची बचत करतात व लाईट बिल कमी येते.

त्यामुळे घरातील ट्रॅडिशनल ऐवजी एलईडी लाईट बल्ब घरात लावावेत. या एलईडी बल्ब मुळे दुहेरी फायदा होतो व तो म्हणजे हे जास्त दिवस टिकतात आणि तुम्हीच कमी वापरत असल्यामुळे विजबिलात देखील बचत होते.

3- चार्जर आणि कम्प्युटर ऑफ करा बऱ्याचदा आपण कम्प्युटरवर काम करत असतो व काम संपल्यानंतर देखील स्वीच ऑन ठेवतो. परंतु असे न करता कम्प्युटरवर काम केल्यानंतर नेहमी पावर स्विच ऑफ करणे गरजेचे आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही मोबाईल चार्जर देखील ऑन ठेवू नये. चार्जरचे काम संपल्यानंतर चार्जर बंद करावे. अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे तर चालू ठेवली तरी विज बिल जास्त येते. या व्यतिरिक्त कम्प्युटर वगैरे स्टॅन्ड बाय मोडवर ठेवू नये.

4- एअर कंडिशनर अर्थात एसीच्या सेटिंगमध्ये बदल उन्हाळ्यामध्ये कुलर आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो व त्यामुळे विज बिल मोठ्या प्रमाणावर येते. याकरिता तुम्ही एसीच्या सेटिंगमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही एसी हा 24 डिग्रीवर सुरू ठेवावा. यामुळे तो वेळोवेळी ऑफ होत राहतो व यामुळे देखील वीज बिल कमी येते.

5- पाच स्टार रेटेड फ्रिज तुमच्या घरात फ्रीज किंवा इतर काही जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या तुम्ही बदलून टाकाव्यात किंवा अपग्रेड करून तुम्ही 40% पर्यंत विजेची बचत करू शकतात.

जर तुम्ही फ्रीज साधारण प्रकारच्या फ्रिज ऐवजी जर पाच स्टार रेटेड असलेल्या फ्रिजची निवड केली तर यामुळे देखील 30 टक्क्यांनी वीज बिलात बचत होते.

कारण या तुलनेमध्ये जर तुम्ही जुना किंवा कालबाह्य झालेला फ्रीज वापरत असाल तर यामध्ये अनेक समस्या उद्भवतात. कधी कधी अशा फ्रिजमध्ये बर्फ जास्त प्रमाणात तयार होतो तर कधी कधी कूलिंगच व्यवस्थित होत नाही.

परंतु वीज मात्र लागते तेवढीच लागते. त्यामुळे जर नवीन फ्रीज घ्यायचा असेल तर तो पाच रेटेड फ्रीज घ्यावा जेणेकरून पैसे आणि विज बिलात बचत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe