Agriculture Business Idea: जांभूळ विक्रीतूनच नाहीतर जांभळाच्या बिया देखील बनवतील शेतकऱ्यांना लखपती! कसे ते वाचा?

Ajay Patil
Published:
jambhul processing business

Agriculture Business Idea:- निसर्गाच्या माध्यमातून ज्या काही वनस्पती व वनस्पतीजन्य इतर पदार्थ आपल्याला मिळतात ते अनेक दृष्टिकोनातून मानवासाठी उपयुक्त असतात. भारतामध्ये आढळणाऱ्या अशा अनेक वनस्पती आहेत की त्यांचा कुठलाही भाग हा मानवाच्या उपयोगाला येणारा असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

परंतु आपल्याला याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित नसल्याने अशा वनस्पतींच्या उपयोग घेण्यापासून मुकतो. आपण बऱ्याचदा खाण्यासाठी फळांचा वापर करतो. परंतु फळ खाताना मात्र अनेक फळांची साल किंवा त्यामध्ये निघणाऱ्या बिया आपण फेकून देतो.

परंतु बऱ्याच फळांची साल आणि बिया देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात व ही बाब आपल्याला माहितीच नसते. अगदी याच पद्धतीने जर आपण आंबट गोड चव असलेल्या जांभूळ या फळाचा विचार केला तर हे फळ जीवनसत्वे व अनेक मिनरल्स अर्थात खनिजांचा एक उत्कृष्ट स्त्रोत म्हणून ओळखले जाते.

असे हे आरोग्यासाठी फायदेशीर असलेले जांभूळ आपण जेव्हा खातो तेव्हा मात्र त्यात निघालेली बी आपण फेकून देतो. परंतु याच जांभळाच्या बिया शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देण्यासाठी फायद्याच्या ठरत असून शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग देणाऱ्या ठरत आहेत.

 जांभळाच्या बियांपासून बनवलेली पावडर आहे फायद्याची

जेव्हा आपण जांभूळ खातो तेव्हा त्याच्यातील बिया फेकून देतो. परंतु याच बियांपासून बनवलेली पावडर अनेक आजार बरे करण्यासाठी वापरली जाते. जांभळाच्या बियांमध्ये डायबिटीस आणि रक्तदाब नियंत्रण ठेवण्याची ताकद असल्याचे बोलले जाते.

तसेच या जांभूळ बियांची पावडर पाचनशक्ती वाढवणारी असून चहा मध्ये देखील बरेच व्यक्ती न चुकता या पावडरचा वापर करतात. जर आपण सध्या बघितले तर काजू तसेच बदाम व वाळलेल्या फळांची पावडर बनवायचा व्यवसाय अनेक जण करत आहेत

व त्यासोबतच बरेच व्यक्ती आता जांभळाच्या बियांची पावडर देखील तयार करू लागले आहेत. या पावडरमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेतच.परंतु पचनाशी संबंधित आजार असतील तर ते दूर करण्याची क्षमता असल्यामुळे या पावडरला बाजारपेठेत देखील चांगली मागणी निर्माण होऊ लागली आहे.

 जांभूळ बियाण्याच्या पावडरचा चहामध्ये होतो वापर

सध्या पित्त आणि पचनाशी संबंधित समस्या वाढीस लागल्यामुळे अनेक व्यक्ती जांभळाच्या बियांच्या पावडरचा वापर चहा मध्ये करतात. या पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असून युरीन इन्फेक्शन व इतर आजारांच्या संक्रमण रोखण्यासाठी या चहाला पसंती दिली जाते.

या दृष्टिकोनातून देखील जांभूळ बियांपासून पावडर बनवण्याचा व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून शाश्वत पर्याय निर्माण करू शकतो. तसेच जांभूळ हे फळ डायबिटीज आणि हाय ब्लडप्रेशर मर्यादित ठेवणारे फळ म्हणून देखील ओळखले जाते व यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील याचे महत्त्व वाढते आहे.

या सगळ्या जांभूळ आणि जांभूळाच्या पावडरीचा उपयोग पाहता या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जर शेतकरी बंधूंनी जांभळाच्या बियांपासून पावडर बनवण्याचा प्रक्रिया उद्योग सुरू केला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe