Health Tips:- शरीराच्या आरोग्यकरता संतुलित आहार घेणे गरजेचे असते व या आहारासोबत वेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश देखील असावा. कारण फळांच्या माध्यमातून देखील शरीराला असलेले पोषक घटक, जीवनसत्वे तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात व शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्यामुळे खूप मोठी मदत होते.
परंतु ज्याप्रमाणे आहार घेताना आपल्याला काही गोष्टी पाहणे गरजेचे असते. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला फळांचे सेवन करताना देखील काही गोष्टी पाळणे खूप महत्त्वाचे असते व ते शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील फायद्याचे ठरते.
या अनुषंगाने जर आपण पाण्याचा विचार केला तर पाण्याला आपण जीवन म्हणतो. परंतु हेच पाणी आपल्याला लगेच फळ खाल्ल्यानंतर जर पिले तर नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे कधीही टाळणे गरजेचे आहे.
फळ खाल्ल्यानंतर जर तुम्ही लगेच पाणी पिले तर ते पोटाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फळ खाल्ल्यानंतर पाणी लगेच पिणे टाळणे गरजेचे आहे.
फळ खाल्ल्यानंतर साधारणपणे एक तास आधी किंवा एक तासाच्या नंतर पाणी पिणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये कोणते फळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये व किती वेळाने प्यावे? याबद्दलची माहिती घेऊ.
कोणते फळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये आणि केव्हा प्यावे?
1- केळी– तज्ञांच्या मते केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे अयोग्य आहे. केळी खाल्ल्यानंतर जर थंड पाणी पिले तर अपचनाची समस्या उद्भवू शकते. कारण थंड पाणी आणि केळी यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे एकसारखेच असतात व ते एकाच वेळी शरीरामध्ये जर गेले तर अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो.
2- पेरू– बऱ्याचदा आपण जेव्हा पेरू खातो व ते खाल्ल्यानंतर तहान लागल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण बऱ्याचदा पेरू खाल्ल्यानंतर पाणी भरपूर प्रमाणात पिऊन जातो. परंतु असे करणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते व त्यामुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते.
3- काकडी आणि टरबूज– काकडी आणि टरबूज ही दोन्ही फळे शरीराच्या पचनक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असून पचनक्रिया सुधारण्याकरिता व बद्धकोष्ठता दूर व्हावी याकरिता खूप उपयुक्त आहेत. परंतु काकडी आणि टरबूज जर तुम्ही खाल्ले आणि त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिले तर पोट खराब होण्याची शक्यता होते व लूज मोशन होऊ शकतात.
4- संत्री, द्राक्ष आणि अननस– ज्या फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असते. अशाफळांमध्ये आधीपासूनच पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर संत्री किंवा अननस, आणि द्राक्षा सारखी पाणीदार असलेली फळ खाल्ले तर पाण्याचे सेवन लगेच करू नये. जर तुम्ही लगेच पाणी पिले तर शरीरातील पीएच पातळी बिघडते व अपचनहोऊ शकते.