अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याला लागली हळदीची लॉटरी! 10 एकरमध्ये घेतले तब्बल 55 लाखांचे उत्पन्न

Ajay Patil
Published:

शेतीमध्ये भरघोस उत्पादन पिकवणे हे बऱ्याच अंशी शेतकऱ्यावर अवलंबून असते. परंतु त्या पिकवलेल्या उत्पादनाचा बाजारभाव ठरवणे मात्र शेतकऱ्यांवर अवलंबून नसते व शेतीमालाचे दर ठरवणारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या पलीकडे असल्यामुळे कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन पिकवून देखील हातात एक रुपया राहत नाही अशी स्थिती होते.

जर शेतकरी बंधूंना जर त्यांनी पिकवलेल्या शेतीमालाचा योग्य बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना कधीच कुठल्याही प्रकारचे अनुदान तसेच कर्जमाफीची गरज असणार नाही किंवा बँकेकडे कर्ज घ्यायला जावे लागणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

परंतु बऱ्याच शेतीमालाचे बाजार भाव कायम घसरलेल्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतीमालाला कवडीमोल किंमत मिळते व शेतकरी चहूबाजूंनी आर्थिक कोंडीत सापडतात. त्यामुळे शेतीमालाला बाजार भाव उत्तम मिळणे खूप गरजेचे आहे.

याच पद्धतीने जर आपण अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील एका शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने दहा एकरामध्ये तीनशे क्विंटल हळदीचे उत्पन्न घेऊन 55 लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण बघणार आहोत.

 दहा एकरात घेतले 55 लाख रुपये हळदीचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील शेतकरी गंगाधरराव देशमुख यांनी हळदीला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे इतर शेतकऱ्यांप्रमाणे हळद लागवडीकडे पाठ न फिरवता उलट यावर्षी हळदीच्या लागवड क्षेत्रात तीन एकरने वाढ केली.

म्हणजेच एकूण यावर्षी त्यांनी दहा एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केलेली होती. तसेच या हळद पिकाचे सुयोग्य व्यवस्थापन त्यांनी ठेवले व करपा सारख्या घातक रोगावर  नियंत्रण मिळवून त्यांनी एका एकरमध्ये तीस क्विंटलचा उतारा काढला व दहा एकर मध्ये त्यांना तब्बल 300 क्विंटल पर्यंत हळदीचे उत्पादन मिळाले.

नसीबाने यावर्षी हळदीला विक्रमी बाजार भाव मिळत असून सध्या 17 ते 18 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत असल्यामुळे त्यांना 300 क्विंटल हळदीतून तब्बल 50 ते 55 लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

दहा एकर हळदीसाठी त्यांनी एकूण पाच ते सात लाखांच्या दरम्यान खर्च केला व हा खर्च वजा जाता निव्वळ नफा म्हणून त्यांच्या हातात 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की, भरघोस उत्पादन घेणे शेतकऱ्याच्या हातात असते व अशा प्रकारे जर बाजारभाव शेतकऱ्याला मिळाला तर नक्कीच शेतकऱ्याला कुणासमोरही हात पसरवायची गरज भासणार नाही हे मात्र नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe