Car Care Tips:- आता बऱ्याच लोकांकडे कार आहेत व प्रत्येक जण कार स्वच्छ ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. बरेच व्यक्ती दररोज सकाळी गाडीला स्वच्छ करतात तसेच पाणी वगैरे मारून चकचकीत करण्याचा प्रयत्न करतात. असं केल्याने गाडी बाहेरून बऱ्याचदा आपल्याला नीटनेटकी आणि स्वच्छ दिसते.
परंतु बऱ्याचदा जेव्हा आपण प्रवासाला निघतो आणि गाडीत बसतो तेव्हा गाडी मधून कुबट असा वास येतो. कारण बऱ्याचदा गाडीमध्ये दुर्गंध किंवा वास येण्याची कारणे पाहिली तर आपण प्रवासामध्ये बऱ्याचदा चिप्स वगैरे इत्यादी खाद्यपदार्थ खात असतो.
हे खात असताना बऱ्याचदा लहान लहान कण गाडीमध्ये विखुरले जातात व ते तसेच पडून राहतात व या कारणामुळे देखील गाडीमध्ये अशा प्रकारचा वास येऊ शकतो. गाडीमध्ये असा वास येऊ नये व गाडी सतत सुगंधी रहावी असे तुम्हाला वाटत असेल तर काही स्वस्तातले पर्याय जर अवलंबले तर नक्की त्याचा फायदा होतो.
या छोट्या टिप्स वापरा आणि गाडी सुगंधी ठेवा
1- कॉफीच्या बिया वापरा– ज्याप्रमाणे आपल्याला कॉफी पिऊन उमेद किंवा तरतरी येते.अगदी त्याचप्रमाणे कॉफीच्या बियांचा वास देखील वातावरण सुगंधी करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. गाडीमध्ये महागडा फ्रेशनर वापरण्याऐवजी जर कॉफीच्या बिया वापरल्या तर हा सोपा व स्वस्त पर्याय आहे.
कारण या बिया गाडीतील येणारा उग्र वास शोषून घेतात. या बियांचा कारमध्ये वापर करायचा असेल तर त्याकरिता त्या एखाद्या कापडामध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि दर आठवड्याला त्या बदलत राहावेत.
2- कारचे एअर व्हेंट्स साफ करणे– गाडीमध्ये बऱ्याचदा एसी एयर व्हेंट्स मोठ्या प्रमाणावर धुळीने माखलेले असतात. त्यामुळे गाडीमध्ये धुळकट हवा किंवा वास येत राहतो. तसेच अशा धुळीमध्ये जीव जंतूंचा प्रादुर्भाव देखील होतो.
या सगळ्या गोष्टींमुळे गाडीत घाणेरडा वास येतोच परंतु आपल्याला देखील त्रास होऊ शकतो. याकरिता कार मधील एअर व्हेंट्स स्वच्छ करण्याकरिता एअरबड्स किंवा स्पंजचा वापर करू शकतात. तसे जेव्हा तुम्ही एसी चा वापर करत नसाल तेव्हा त्याचा फ्लॅप बंद करून ठेवणे गरजेचे आहे.
3- इसेन्शियल ऑईलचा वापर करा– इसेन्शियल ऑईल हे सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरतात किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
परंतु कार मधील नकोसा दुर्गंध घालवण्यासाठी देखील त्याचा वापर होतो. या तेलाचे दोन किंवा तीन थेंब जरी वापर केला तरी गाडीमध्ये सुगंध व वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी त्याची मदत होते. हे तेल तुम्ही डिफ्युजर मध्ये घालून ठेवू शकता.