देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वातावरण गरम झाले असून सात टप्प्यांमध्ये संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात ही निवडणूक पार पाडली जाणार आहे. साधारणपणे या लोकसभा निवडणुकीचा 19 एप्रिलला पहिला टप्पा सुरू होणार असून त्या दृष्टिकोनातून आता प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या घोषित केल्या जात आहेत.
या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने अनेक महत्त्वाचे नियम घालून दिलेले असून मतदारसंघांमध्ये निवडणुकीला उभा राहणारा उमेदवार नेमका कसा आहे? म्हणजे त्याची पार्श्वभूमी नेमकी कशी आहे
इत्यादी संबंधी माहिती मतदारांना असावी या दृष्टिकोनातून देखील निवडणूक आयोगाने एक पाऊल पुढे उचलले असून याकरिता नो युवर कॅंडिडेट नावाचे एप्लीकेशन लॉन्च केलेले आहे. या एप्लीकेशनच्या मदतीने उमेदवाराची पार्श्वभूमी तसेच त्याचे संपत्ती व इतर महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे
या एप्लीकेशनच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही की? जर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याच्यावर किती तक्रारी दाखल आहेत इत्यादी देखील माहिती अप्लिकेशनच्या माध्यमातून कळणार आहे.
नो युवर कॅंडिडेट म्हणजेच केवायसी ॲप करेल मदत
या निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुमच्या परिसरात उभे राहणाऱ्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही किंवा त्याच्याकडे किती संपत्ती आहे? इत्यादी बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नो युवर कॅंडिडेट नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे.
या ॲप्लिकेशनच्या मदतीने मतदारांना उमेदवाराचे बॅकग्राऊंड तसेच त्याचे संपत्ती व इतर माहिती मिळणार आहे. कारण आपल्या मतदारसंघातून आपलं प्रतिनिधित्व करणारा उमेदवाराबाबत माहिती करून घेणे हा मतदारांचा हक्क असून त्या दृष्टिकोनातून हे ॲप्लिकेशन महत्त्वाचे आहे.
या एप्लीकेशनचा वापर कसा कराल?
1- हे एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.
2- यामध्ये मतदार आपल्या उमेदवाराचं नाव टाकून त्याबाबत सर्च करू शकतात.
3- यामध्ये उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देण्यात आलेली आहे.
4- हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून उमेदवारावर किती प्रकारचे व कोणत्या प्रकारचे गुन्हे किंवा आरोप आहेत हे देखील सांगण्यात आलेले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना सूचना
राजकीय पक्षांनी क्रिमिनल बॅकग्राऊंड असणाऱ्या उमेदवारांची घोषणा केली असेल तर त्या घोषणा करताना त्यामागे काय विचार होता हे राजकीय पक्षांना स्पष्ट करणे गरजेचे आहे.
इतर उमेदवारां ऐवजी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची निवड का केली गेली हे देखील पक्षांना सांगावे लागणार आहे. एवढेच नाही तर उमेदवारांनी स्वतःची क्रिमिनल हिस्ट्री म्हणजेच गुन्हेगारी पार्श्वभूमी स्वतःच उघड करणे गरजेचे असल्याचे देखील निवडणूक आयोगाने म्हटले आहे.