मारुती सुझुकीच्या कार वापरत असाल तर ही बातमी वाचाच !

Ahmednagarlive24
Published:

देशामध्ये अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये मारुती सुझुकी ही कंपनी सर्वात प्रसिद्ध व देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतींमध्ये आजपर्यंत मारुती सुझुकीने अनेक कार बाजारपेठेत सादर केलेले आहेत. एवढेच नाही तर इतर कंपन्यांच्या कार पेक्षा मारुतीच्या अनेक कारचे मॉडेल्स सर्वाधिक विक्री होताना आपल्याला दिसून येतात.

अशाच प्रकारे मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या दोन कार मॉडल्सच्या सोळा हजार कार कंपनीने परत मागवल्या असून यामागे इंजिन मध्ये बिघाड झाल्याचे कारण देण्यात आलेले आहे.

याबाबत 22 मार्च 2024 रोजी कंपनीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले की ज्या ग्राहकांकडे हे मॉडेल्स असतील त्यांनी ते जवळच्या सेवा केंद्र मध्ये घेऊन जावे व आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी.

कोणते आहेत हे कार मॉडेल्स?
याबाबत मारुतीच्या माध्यमातून घोषणा जारी करण्यात आली असून यानुसार बलेनो वॅगन आर या दोन कार मॉडेल्सच्या समावेश असून या दोन्ही मॉडेलच्या कारमध्ये अशा प्रकारचा दोष आढळून आलेला आहे.

या दोन्ही मॉडेलच्या सुमारे 16000 कारच्या इंधन पंप मोटर मध्ये समस्या आहे व गाडी सुरू करण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही तर कधीकधी या गाड्या चालताना थांबतात.

त्यामुळे ज्या गाड्यांना अशा प्रकारचे समस्या येत असेल त्यांनी जवळच्या सेवा केंद्रामध्ये नेऊन उपकरणे बदलून घेण्याची आव्हान देखील कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. मारुतीने माहिती देताना म्हटले की जवळपास 11851 बलेनो कार व ४१९० वॅगन आर कार मध्ये या प्रकारची समस्या आलेली आहे.

ज्या ग्राहकांच्या कारला अशा प्रकारच्या समस्या येत असतील त्यांनी जवळच्या सेवा केंद्र मध्ये जाऊन मोफत उपकरणे बदलून येणे गरजेचे असून याकरिता तुम्हाला एक रुपया देखील देण्याची गरज नाही.

या समस्या आलेल्या गाड्या साधारणपणे कंपनीच्या माध्यमातून 30 जुलै 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान तयार करण्यात आलेले आहेत व याच कालावधीत तयार झालेल्या कारचा इंजिनच्या इंधन पंप मोटर मध्ये बिघाड झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe