Rose Farming Tips :- सध्या पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळबाग लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिकांची लागवड व मोठ्या प्रमाणावर पॉलिहाऊसच्या माध्यमातून पुढील पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत.
ज्याप्रमाणे पॉलिहाऊस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाजीपाला पिकांची लागवड केली जाते अगदी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या फुलांची लागवड देखील या तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकरी करतात. पॉलिहाऊस तंत्रज्ञानामध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येणे शक्य झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ झालेली आहे.
यामध्ये फुल शेतीचा विचार केला तर पॉलिहाऊस मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे उत्पादन शेतकरी घेतात. परंतु गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणावर पॉलिहाऊसमध्ये शेतकरी करतात. या दृष्टिकोनातून उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर गुलाब फुलांचे उत्पादन शेतकरी घेतात.
या दृष्टिकोनातून पॉलीहाउसमध्ये जर तुम्हाला गुलाब फुलांची शेती करायची असेल व फुलांची साईज वाढवायची असेल तर त्याबाबत तुम्ही काही छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष दिले तर नक्कीच फायदा मिळू शकतो. याच बाबी विषयी महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
गुलाबाच्या फुलांची साईज कशी वाढवावी?
गुलाब या फुलाची मागणी लग्न समारंभापासून तर अनेक सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये असते.एवढेच नाही तर गुलाबाच्या फुलापासून गुलकंद तसेच गुलाब जल व तर उत्पादन देखील तयार केले जाते. त्यामुळे गुलाबाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
तुमच्या देखील शेतामध्ये गुलाबाची लागवड केली असेल व मोठ्या आकाराच्या गुलाबाच्या फुलांचे उत्पादन मिळवायचे असेल तर त्याकरिता तुम्ही बल्बचा वापर करू शकतात. हे तंत्र तुम्ही पॉलिहाऊस मध्ये वापरणे फायद्याचे ठरते.
कसा कराल बल्बचा प्रभावी वापर?
गुलाबाच्या झाडांना प्रकाशाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते व या प्रकाशाच्या मदतीने गुलाबाच्या फुलांच्या कळ्यांचा विकास वेगात होतो. यामध्ये तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्यानुसार पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची शेती करताना जास्त प्रमाणामध्ये प्रकाश व कमीत कमी तापमान ठेवल्यास गुलाबाच्या झाडांना फुटवे अधिक येतात.
त्यामुळे शेतकऱ्यांनी जर बल्बचा वापर केला तर मोठ्या आकाराचे फुल मिळण्यास मदत होते. तसेच पॉलिहाऊसमध्ये तापमान कमी होऊन जाते व थंडीच्या दिवसांमध्ये देखील अधिक उत्पादन मिळवण्यासाठी या उपायाचा फायदा होतो.
फुलांच्या काढण्याची योग्य पद्धत किंवा योग्य वेळ
साधारणपणे गुलाबाच्या फुलांची तोडणी कळीच्या अवस्थेत करणे आवश्यक असते. ज्या वेळेला कळीच्या एक किंवा दोन पाकळ्या खुलायच्या बाकी असतात त्यावेळी फुलांची तोडणी करावी. गुलाबाची तोडणी करताना कळी खूप मोठी होऊ देऊ नये.
कारण लहान अवस्थेमध्ये कळी तोडली तर ती पूर्ण क्षमतेने खुलायला मदत होते. तसेच फुलांची तोडणी करताना लांब दांडे ठेवून तिरका काप द्यावा व पाण्यामध्ये फुल बुडवून ठेवावे. त्यामुळे विक्रीला नेत्यांना ते जास्त कालावधी करिता ताजेतवाने राहण्यास मदत होते.