Grape Farming: नाशिकच्या वाजे बंधूंनी घेतले क्रिमसन लाल द्राक्षाचे उत्पादन! परदेशात निर्यात करून मिळाले तब्बल 19 लाख 50 हजारचे उत्पादन

Ajay Patil
Published:
crimson red grape

Grape Farming:- महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे पटकन डोळ्यासमोर येते ते तिथल्या द्राक्ष बागा, तसेच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तसेच मालेगाव, कळवण इत्यादी भागात विकणारा कांदा आणि डाळिंब इत्यादी पिके होय. नाशिकला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाते.

परंतु गेल्या काही वर्षापासून निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे  द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे दरवर्षी अतोनात नुकसान होताना आपल्याला दिसून येत आहे व घसरलेले बाजारभावामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सध्या नाशिक जिल्ह्यात चित्र आहे.

काही काही ठिकाणी तर शेतकरी बंधूंनी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवून बागा नष्ट केल्यात. परंतु विपरीत नैसर्गिक परिस्थिती व घसरलेले बाजारभाव इत्यादी समस्यांना तोंड देत बऱ्याच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादन गेल्यावर भर दिला.

अशाच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील जास्त पावसाचा परिसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकरी कैलास वाजे, संपत आणि नवनाथ वाजे या भावंडांनी क्रीमसन  लाल द्राक्षाची लागवड केली व यशस्वीपणे उत्पादन घेतले. हे द्राक्ष परदेशात निर्यात करण्यासाठी आवश्यक परवाने मिळवून देण्यासाठी

त्यांना कृषी पर्यवेक्षक किशोर भरते तसेच विजय कापसे यांची मोलाची मदत झाली. त्यांची पिकवलेले हे क्रीमसन लाल द्राक्ष मोहाडी या ठिकाणहून विदेशात रवाना झाली आहेत. वाजे बंधू हे गेल्या तीन वर्षापासून अडीच एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष शेती करत आहेत.

 क्रिमसन द्राक्षाला मिळाला प्रति किलो 130 रुपये दर

वाजे बंधूंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व कष्टाने अडीच एकरमध्ये पंधरा टन क्रीमसन लाल द्राक्षांचे उत्पादन घेतले व या द्राक्षांना यावर्षी प्रतिकिलो 130 रुपये बाजार भाव मिळाला. याप्रमाणे पंधरा टन द्राक्षाचे 19 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळाले.

या द्राक्ष बागेला ते प्रामुख्याने शेणखत तसेच रासायनिक व सेंद्रिय खते देतात. कैलास वाजे यांचे बीएससी ऍग्री पर्यंत शिक्षण झालेले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकीच्या दोन भावांनी द्राक्ष बागेची नियोजन केले. विशेष म्हणजे त्यांचे 16 जणांचे कुटुंब एकत्र राहते.

हे तीनही भाऊ प्रगतिशील शेतकरी असून द्राक्ष बागा व्यतिरिक्त ते 22 एकरामध्ये विविध प्रकारचे पिके देखील घेतात. तसे पाहायला गेले तर त्यांच्या या परिसरामध्ये प्रामुख्याने सोनाका तसेच थॉमसन, हिरवा रंग असलेली द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.परंतु वाजे बंधूंनी क्रीमसन लाल द्राक्षाची शेती करण्याचा निर्णय घेतला व कष्टाने भरघोस उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा देखील मिळवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe