अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ परशाला अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- ‘ सैराट’फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून नगर शहरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या पुण्या भामट्याला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली.

शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज ( रा . पिंपरी चिंचवडी , जि . पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे . त्याने महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे.

एमआयडीसी येथे राहत असलेल्या महिलेने अहमदनगर सायबर सेलकडे २२ मे रोजी तक्रार केली होती . या महिलेचा चार महिन्यांपूर्वी फेसबुकवर ‘ सैराट’फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला.

पिंपरी चिंचवडी येथील शिवदर्शन चव्हाण हा हे खाते हाताळत होता. याच खात्यावरून त्याने नगरमधील महिलेशी मैत्री वाढवली.अभिनेता आकाश ठोसर म्हणूनच शिवदर्शन याने या महिलेशी फोनवरही संभाषण सुरू ठेवले.

त्यातून पुढे त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून पैशाची गरज व्यक्त केली. या महिलेने एवढा मोठा अभिनेता पैसे मागतो आहे , म्हणून लगेचच पैसे देण्याची तयारी दर्शवली.

हे पैसे घेण्यासाठी नगरला येतो ,असे त्याने महिलेला सांगितले. आकाश ठोसर स्वतः पैसे घेण्यासाठी येणार म्हटल्यावर महिला हुरळून गेली होती. पण आकाश ठोसर म्हणून बोलत असलेल्या शिवदर्शन याने ऐन वेळेला महिलेला संपर्क साधून मला यायला जमणार नाही ,

मित्राला पाठवितो , असे सांगितले. त्यानुसार आकाश ठोसर असल्याचा अभिनय करणारा शिवदर्शन स्वतः नगरमध्ये आला आणि या महिलेकडून दागिने घेवून गेला.

दागिने मिळाल्यानंतर शिवदर्शन याने आकाश ठोसरच्या नावाने हाताळत असलेले आणि त्याने तयार केलेले फेसबुकवरील बनावट खाते बंद केले. त्यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तिने अहमदनगर सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment