शेती कामासाठी घ्या हा ‘एस्कॉर्ट’चा छोटा ट्रॅक्टर! मिळेल कमी किमतीत आणि करेल शेतीत उत्कृष्ट कामे, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
escort steeltrack tractor

ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या जिवाभावाचे आणि जिव्हाळ्याचे कृषी यंत्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतीमधील प्रत्येक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. अगदी शेतीची पूर्व मशागत असो किंवा अंतर मशागत आणि तयार शेतीमाल घरापर्यंत किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर उपयोगी पडते.

तसेच शेती क्षेत्रामध्ये बरीचशी यंत्रे विकसित झाली आहेत व त्यातील बरीच यंत्रे ट्रॅक्टरचलीत असल्याकारणाने ट्रॅक्टरचा वापर हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. परंतु जर यामध्ये आपण मोठ्या ट्रॅक्टरच्या दृष्टिकोनातून बघितले तर अशा ट्रॅक्टरांच्या किमती जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणे परवडत नाही.

त्यामुळे बरेच शेतकरी शेतीतील अनेक कामांकरिता मिनी ट्रॅक्टरचा वापर करतात. अशा प्रकारचे मिनी ट्रॅक्टर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहेत व बाजारपेठेत विक्रीसाठी देखील आहेत.

यामध्ये एस्कॉर्ट स्टीलट्रॅक हे मिनी म्हणजेच छोटे ट्रॅक्टर खूप महत्त्वाचे असून शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता किंवा आर्थिक बजेट समोर ठेवून ट्रॅक्टर तयार करण्यात आलेले आहे. याच ट्रॅक्टरची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

 ही आहेत एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टरची महत्त्वाची वैशिष्ट्ये

हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ट्रॅक्टर असून ते 895 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडरमध्ये उपलब्ध असून यामध्ये वॉटर कूलिंग सिस्टम देण्यात आलेली आहे. या ट्रॅक्टरचे इंजिन 18 हॉर्स पावरची निर्मिती करते व या ट्रॅक्टरला ऑइल बाथ टाइप एअर फिल्टर देण्यात आला असून या एअर फिल्टरमुळे धूळ तसेच माती व इतर गोष्टींपासून इंजिन सुरक्षित राहते.

एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टरची पीटीओ पावर 15.4 एचपी असल्यामुळे शेतीची बाकीची अवजारे सुरळीतपणे या माध्यमातून चालवली जाऊ शकतात. या ट्रॅक्टरचे पावरफुल इंजिन 2300 आरपीएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 450 किलोग्रॅम असून या ट्रॅक्टरचे वजन 910 किलो आहे. या ट्रॅक्टरचा व्हिलबेस 1524 एमएम इतका आहे.

यामध्ये मॅन्युअल स्टेरिंग देण्यात आलेली असल्याने ड्रायव्हरला ट्रॅक्टर चालवताना कम्फर्टेबल फिल येतो. या ट्रॅक्टरला आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स दिलेला असून हा छोटा ट्रॅक्टर सिंगल क्लच मध्ये उपलब्ध आहे व त्याला कंपनीच्या माध्यमातून सिंक्रोमेश टाईप ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

तसेच ड्राय डिस्क ब्रेक्स देण्यात आलेले आहेत. तसेच कंपनीकडून या छोट्या ट्रॅक्टरला फॉरवर्ड म्हणजेच पुढील बाजूस पंचवीस किमी प्रति तास आणि रिव्हर्स म्हणजेच मागच्या बाजू 4.53 किमी प्रति तासाचा वेग देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरला 18 लिटर क्षमतेची डिझेल टाकी असून हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राईव्हसह उपलब्ध आहे.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 2 लाख 98 हजार ते 3 लाख 35 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेले रोड टॅक्स आणि आरटीओ रजिस्ट्रेशन यामुळे काही ठिकाणी किमतीत बदल होऊ शकतो. यासोबतच या ट्रॅक्टर सोबत कंपनीने दोन वर्षाची वारंटी देखील दिलेली आहे.

त्यामुळे एस्कॉर्ट स्टीलट्रॅक ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी निश्चित फायद्याचे ठरेल हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe