Apple Crop Cultivation: यवतमाळ जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने अतिशय उष्ण असलेल्या परिसरामध्ये फुलवली 1 एकर सफरचंदाची बाग! वाचा कसं केले नियोजन?

Ajay Patil
Published:

Apple Crop Cultivation:- आजकालचे तरुण हे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागले असून नोकऱ्यांची उपलब्धता खूप कमी असल्याने बरेच तरुणाची घरची शेती आहे व असे तरुण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या फळबागांची लागवडीकडे भर देताना सध्या दिसून येत आहे.

तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालना सारखा व्यवसाय देखील आता तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत आहेत. असे तरुण शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करत असून बरेच प्रयोग हे यशस्वी होताना देखील दिसून येत आहे.

अशाच प्रकारचा प्रयोग राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजारच्या संदीप हांडे  या तरुण शेतकऱ्याने केलेला असून त्याने चक्क एक एकर क्षेत्रावर 425 सफरचंदाच्या झाडांची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.

 अशाप्रकारे केले सफरचंदाचे लागवडीपासून ते बाकीचे नियोजन

राळेगाव तालुक्याचा दृष्टिकोनातून पाहिले तर हा एक मिरची उत्पादक पट्टा असून लाल मिरची उत्पादनासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. परंतु या तालुक्यातील  वाढोणा या गावचे संदीप हांडे यांनी मिरची पिकासोबतच सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला

व 2022 मध्ये 425 सफरचंदाच्या झाडांची लागवड केली व त्यातील 420 झाडे जगवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. 2023 मध्ये सफरचंदाच्या झाडांना फळधारणा झाली होती. महाराष्ट्रामध्ये डोरसेट बोल्डर, हरमन 99 आणि अण्णा या जातीच्या अधिक तापमानामध्ये येणाऱ्या सफरचंदाची शिफारस महाराष्ट्राकरिता करण्यात आल्याचे देखील संदीप यांनी सांगितले.

सफरचंदाची छाटणी ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केली जाते व त्यानंतर पाणी आणि खत व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये बाग फुलधारणेवर येते. 100 ते 200 ग्रॅम प्रत्येक झाडाला खत देण्यावर त्यांचा भर राहतो आणि जून महिन्याच्या दरम्यान फळे परिपक्व होत असते. सफरचंदाच्या बागेला त्यांनी ड्रीपच्या माध्यमातून पाणी देण्याची सोय केलेली आहे.

हिमाचलप्रदेश आणि  बिलासपूर येथील सफरचंद बागेच्या तज्ञांकडून त्यांनी या पिकाच्या व्यवस्थापनाचे अनेक बारकावे जाणून व समजून घेतले व त्या पद्धतीने पिकाचे नियोजन करायचे ठरवले.

त्यांच्या या प्रयोगाची दखल कृषी विभागाच्या माध्यमातून देखील घेण्यात आली आहे. तसेच सफरचंद बागेतील छाटणी ही शास्त्रोक्त पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्यामुळे सफरचंद बागेची छाटणी कौशल्यपूर्ण मजुरांच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे मजूर उपलब्ध नसतील तर मात्र नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe