काकडीच्या ‘या’ वाणाची लागवड म्हणजे कमी खर्चात व कमी वेळेत भरघोस उत्पादनाची हमी! 70 दिवसात यायला लागेल हातात पैसा

Ajay Patil
Published:

भाजीपाला पिकांची लागवड ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून कमीत कमी खर्च आणि कमीत कमी कालावधीमध्ये हातामध्ये चांगला पैसा या पिकाच्या माध्यमातून मिळतो. कारण बऱ्याच भाजीपाला पिकांचा कालावधी  खूप कमी असल्याने जास्तीत जास्त दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या पिकांच्या काढणीला सुरुवात होते.

शेतकरी विविध प्रकारच्या भाजपाला पिकांची लागवड करतात. यामध्ये प्रामुख्याने मिरची, वांगी, टोमॅटो व यासोबतच जर आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकांचा विचार केला तर कारली, गिलके, दोडके आणि काकडीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये उन्हाळ्यात काकडीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते.

म्हणून तुम्हाला देखील काकडीची लागवड करायची इच्छा असेल तर या लेखामध्ये आपण काकडीच्या एका महत्त्वपूर्ण आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वानाची माहिती घेणार आहोत. ज्याची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरेल.

 काकडीचास्वर्ण शितलवाण देईल  भरघोस उत्पादन

काकडीचा स्वर्ण शितल वाण हा काकडीच्या भरघोस उत्पादनासाठी खूप महत्त्वपूर्ण असा वाण असून या वानाची काकडी मध्यम आकाराची असते. समजा एक हेक्टरमध्ये जर काकडीच्या या प्रजातीची लागवड केली तर 290 ते 300 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणे शक्य आहे.

तसेच काकडीच्या या स्वर्ण शीतल वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रोगांना जास्त प्रमाणात सहजासहजी बळी पडत नाही. त्यामुळे साहजिकच रोग नियंत्रणासाठीचा खर्च वाचतो. लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांमध्ये काढणीला येतो. उन्हाळ्यात जर लागवड करायची असेल तर मार्च महिन्यात या प्रजातीच्या काकडीची लागवड करणे फायद्याचे ठरते.

याशिवाय पावसाळ्यामध्ये देखील जून व जुलै महिन्याच्या कालावधीत या वाणाची लागवड करता येते.डोंगराळ भागांमध्ये जमीन असेल तर मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये देखील या प्रजातीची  लागवड करणे शक्य आहे.

 स्वर्ण शितल वाणाच्या बियाण्याची किंमत किती आहे?

जर तुम्हाला देखील स्वर्ण शीतल जातीच्या काकडीची लागवड करायची असेल तर याची बियाणे हे 50 ग्रॅमच्या पॉकेटमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या 50 ग्रॅम पॅकेटची किंमत साठ रुपये असून 31 टक्के सवलतीसह ते ऑनलाईन देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तुम्ही हे घरबसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करू शकतात.

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काकडीचे स्वर्ण शीतल या वाणाचे बियाणे ऑनलाईन पद्धतीने मागवता येते. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून तुम्हाला हे बियाणे मागवायचे असेल

ते ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून मागवू शकतात. या ऑनलाइन प्लेटफॉर्म वर शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे बियाणे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना घरबसल्या हव्या त्या प्रजातीची बियाणे मागवता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe