Ahmednagar News : तब्बल २५ वर्षांत एमआयडीसीत एकही मोठा उद्योग नाही ! मुलांना शिक्षण आहे पण नोकरी नाही.. पहा आहे त्याच एमआयडीसीचे भीषण वास्तव

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा उत्तर व दक्षिण भागात विखुरलेला. उत्तरेकडे पाणी असल्याने शेती चांगली आहे. परंतु दक्षिणेकडे मात्र कायमच दुष्काळी स्थिती असते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः दक्षिणेसाठी तरुणांच्या नोकरीसाठी विशेषतः प्रयत्न हवेत.

आता सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीबाबत घोषणा केलीच आहे. ती अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण यातून नवनवीन रोजगाराच्या नवनवीन मार्ग तयार होतील. परंतु प्रश्न त्यांचा नाही, प्रश्न आहे तो राजकीय असो सामाजिक या सर्वच बाबींचा की त्यांनी कधी आहे त्याच नगर एमआयडीसीचे प्रश्न सोडवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही असे लोकांना चर्चा आहे.

मागील २५ वर्षांत नगरच्या एमआयडीसीत एकही मोठा उद्योग आला नाही. परिणामी, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी येथील तरुणांना पुणे, मुंबईची वाट धरावी लागत असल्याचे चित्र आहे.

नगरमधील एमआयडीसीमध्ये सुरवातीचा काळ जर पाहिला तर गरवारे, सह्याद्री, व्हीडीओकॉन, कायनेटिक आदी मोठे उद्योग आले. तरुणांच्या हाताला काम मिळाले. कालांतराने हे कारखाने येथून निघून गेले. सध्या क्रॉप्टन, लार्सन अॅण्ड टुब्रो, सनफार्मा, क्लासिक व्हील, एक्साइड, सिद्धी फ्रोज एवढेच उद्योग सुरू आहेत. साधारण २००० पूर्वी हे कारखाने आले.

या कारखान्यांमुळे लहान-मोठे उद्योग उभे राहिले. त्यानंतर मात्र येथील औद्योगिक विकास थांबलेलाच आहे. त्याला अजून चालना मिळाली नाही. एकही बहुराष्ट्रीय कंपनी आली नाही किंवा मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

आजूबाजूच्या शहरात हजारो तरुणांना रोजगार देणारे आयटी पार्क उभे राहत आहेत. आयटी क्षेत्राकडे तरुणांचा कल वाढला आहे. त्यामुळे आयटीचे शिक्षण देणाऱ्या संस्था वाढल्या. परंतु, आयटी पार्क किंवा आयटी उद्योग आले नाहीत. त्यामुळे आयटीचे शिक्षण पूर्ण करायचे आणि नोकरीसाठी पुणे, मुंबईची वाट धरायची, हे अनेक दशकांपासून सुरू आहे. ही नोकरीसाठीची पायपीट कधी थांबेल, यावर कुणीच बोलत नाही.

आता मंत्री विखे पाटलांचा शब्द खरा ठरला तर…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता यात लक्ष घातले आहे. तीन एमआयडीसी मंजूर केल्या आहेत. त्यांच्या प्रयत्न्न जर यश आले तर नगरचे कल्याण होईल हे निश्चित.नगरच्या दुष्काळाला एमआयडीसीचा पर्याय आहे. जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भाग दुष्काळी आहे. एमआयडीसीमुळे तरुणांच्या हाताला काम लागेल हे मात्र नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News