भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. या पशुधनाची काळजी आणि संपूर्ण डाटा पशुसंवर्धन विभागाकडे राहावा याकरिता केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत.याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
या प्रणालीमध्ये इअर टॅगिंगची नोंद घेण्यात येत असून या माध्यमातून जनावरांचे जन्म मृत्यूची नोंदणी तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, जनावरांवरील वंध्यत्व उपचार आणि मालकी हक्क हस्तांतरण इत्यादी माहितीचा समावेश असणार आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांचे इअर टॅगिंग करून घेणे खूप गरजेचे आहे. जर जनावरांची इअर टॅगिंग केली नाही तर एक जून 2024 पासून सदर पशुधनाची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जनावरांची इअर टॅगिंग करणे गरजेचे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून या प्रणाली अंतर्गत इअर टॅगिंगची नोंद घेण्यात येत असून यामध्ये जनावरांचा जन्म मृत्यूची नोंदणी पासून तर प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार,
वंध्यत्व उपचार आणि मालकी हक्क हस्तांतरण इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे. जर पशु मालकांनी जनावरांची इयर टॅगिंग केली नाही तर मात्र एक जून 2024 पासून जनावरांची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच भारत पशुधन प्रणालीवर जर पशुधनाची नोंद नसेल तर पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा देखील मिळणार नाही.
याकरिता पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून जनावरांच्या कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे आता पशुधनाची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे व यामुळे पशुधनातील जे काही संसर्गजन्य रोग असतात त्यांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता खूप मोठी मदत होणार आहे.
ज्या जनावरांना इयर टॅगिंग केलेली नसेल अशा जनावरांची बाजार समित्या, आठवडा बाजार आणि गावागावातील खरेदी विक्री करण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकारचे इअर टॅगिंग नसलेले जनावरे बाजार समितीत आणले गेले तर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची असणार आहे.
तसेच पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून अपडेट करून घेण्याची जबाबदारी ही पशुपालकांची असणार आहे.
समजा विजेचा धक्का, नैसर्गिक आपत्ती, वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे जर एखाद्या पशुधनाचा मृत्यू झाला व त्या पशुधनाला जर इअर टॅगिंग केली नसेल तर त्यासंबंधीची भरपाईची रक्कम देखील मिळणार नाही. नाहीतर अशा पशुधनाची वाहतूक देखील करता येणार नाही. त्यामुळे सर्व पशुपालकांनी पशुधनाचे इअर टॅगिंग करून घेणे गरजेचे आहे.