अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. परंतु तो तरुण मागील महिन्यात २५ मे रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता.
दिवसभर तेथेच वास्तव्यास होता. त्यामुळे एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून गोधेगावातील ज्या ठिकाणच्या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची ८० घरांची लोकवस्ती आहे.
तेथील सर्व कुटुंबांना पुढील दहा दिवसाठी होम क्वारंटाईन केले आहे. यातील थेट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींचे स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे.
अजूनही चार व्यक्ती संपर्कात आल्या असून त्यांची माहिती घेत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews