अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : व्हाट्सएप आणि टेलिग्रामवर एका महिलेने “लव्ह चॅट्स” ने तरुणाला फसवण्याचा प्रकार घडला आहे. मालविका देवती असं या महिलेचे नाव असून ती ४४ वर्षांची आहे.
या महिलेने लग्नाच्या बहाण्याने अमेरिकेतील एका एनआरआयची तब्बल 65 लाखांची फसवणूक करणार्या या महिलेच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पहिल्या तक्रारीनंतर 27 मे रोजी या महिलेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हैद्राबादमधील आयटी इंजिनिअप के.पी.एच.बी. पोलिसात या महिलेविरोधात तक्रार नोंदविली आहे.
मालविकाने तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. 27 मे रोजी ज्युबिली हिल्स पोलिसांनी मालविका आणि तिचा मुलगा प्रणव ललित गोपाळ देवाथी (वय 22) यांना अमेरिकेतील एनआरआय अभियंत्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
या महिलेने बनावट प्रोफाइल वापरुन लग्नाचे आमिष दाखवून इंजिनिअर तरुणाकडून कोटींमध्ये रुपये उकळल्याचा आरोप आहे.
तिने जुबिली हिल्समधील डॉक्टरच्या नावाखाली तरुणाची फसवणूक केली. मालविकाने त्याला सांगितले की, तिच्याकडे बरीच मालमत्ता आहे आणि मात्र तिची आई सर्व संपत्ती तिच्याकडे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत आहे.
तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर लढा देण्यासाठी तिला पैशांची गरज आहे. त्या एनआरआयला मालविकाने केलेली थाप पटली.
आणि त्यांनी 65 लाख रुपये पैसे ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तिच्याशी संपर्क होत नसल्याने आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews