आमदार बबनराव पाचपुते यांचे आंदोलन म्हणजे श्रेयासाठी केलेली नौटंकी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन ६ जूनपासून सोडण्याचा निर्णय २९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी १ जूनला उपोषण केले.

त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी बुधवारी केली. पत्रकात शेलार यांनी म्हटले आहे, कुकडीचे पाणी लवकर सुटावे, म्हणून मी पाठपुरावा करत होतो.

त्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचीही मदत घेत होतो. पवार व माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह मंत्री पाटील यांची पुण्यातील सिंचन भवनात भेट घेतली.

त्याच भेटीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. याचा सुगावा लागताच श्रेय स्वतःला मिळावे, म्हणून पाचपुते यांनी उपोषणाची घोषणा केली. ही त्यांची कायमचीच सवय आहे व जनतेला हे काही नवीन नाही.

पाचपुतेंना खरोखर तळमळ असती, तर त्यांनी २९ एप्रिलच्या कालवा सल्लागार समिती बैठकीत निर्णय झाला नाही, त्याच वेळी आंदोलनाची भूमिका घेतली असती, पण तसे झाले नाही.

कुकडी कालव्याच्या पाण्याबाबत श्रीगोंदे तालुक्यावर सर्वाधिक अन्याय पाचपुते सत्तेत असताना झाला. त्याच काळात सर्वाधिक आंदोलनेही झाली. त्यावेळी आंदोलनाने पाणी येत नसतं असं सांगणारे पाचपुते आता आंदोलनाची नौटंकी का करतात,

असा सवाल करून शेलार म्हणाले, २००९ मध्ये आपण पिंपळगाव जोगे धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी काढून शेतकऱ्यांची उभी पिके व फळबागा वाचवण्यासाठी चार दिवस उपोषण केले होते.

त्यावेळी पाचपुते मंत्री होते. डेडस्टोअरेजचे पाणी काढूच शकत नाही असे सांगून उपोषण सोडण्यासाठी ते दबाव आणत होते. पाणी सोडण्याचा निर्णय झाला की, श्रेय तुम्ही घ्यायचे आणि अडचण झाली की, दोष आमदारांना द्यायचा.

अपयश आले, तर त्याची जबाबदारी घेण्याचीही दानत ठेवा. सत्तेत असताना एक भूमिका व विरोधात असले की, वेगळी भूमिका ही बनवाबनवी लोकांना पुरती ठाऊक आहे, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment