अहमदनगर :- नगर दक्षिणेतून निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगेच कामाचा तडाखा सुरू केला आहे.
परंतु कामे करतांना मात्र त्यांनी राजशिष्टाचाराला अक्षरशः हरताळच फासल्याचा प्रचार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरुवारी खा.सुजय विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली.

अर्थात लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेत बैठक घेण्यासाठी सभागृहासह समिती सभागृह असतांना तेथे बैठक न घेता खा.डॉ. विखे यांनी अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये बैठक घेतली.
तीही थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घेतल्याने अधिकाऱ्यांसह सभापतींनी ही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान खा.डॉ. विखे हे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे सुपुत्र असले तरी राज शिष्टाचाराचे पालन होणे आवश्यक आहे. परंतु त्याचा विसर खा. डॉ. विखे यांना पडला असल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे मार्गी लागावीत या हेतूने खा. डॉ. विखे यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली.

अर्थात खासदार म्हणून डॉ. विखे यांना ही बैठक जिल्हा परिषदेतील समिती सभागृहात घेता आली असती. जिल्हा परिषदेत तीन समिती सभागृह आहेत.
परंतु तेथे बैठक न घेता त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमध्ये घेतली. एवढे नाही तर थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीला अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर यांच्यासह काही सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे दोन्ही सभापती या बैठकीला उपस्थित असतांना एकानेही डॉ. विखेंना राजशिष्टाचाराचा आठवण करू दिली नाही.
त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांच्या दर्जा आहे.
असे असतांना खासदार म्हणून डॉ.विखे यांनी राजशिष्टाचार पाळला पाहिजे होता. असे मत बैठकीला उपस्थित असलेल्यांनी व्यक्त केले.
- BEL Share Price: डिफेन्स क्षेत्रातील ‘हा’ शेअर गुंतवणूकदारांना करणार मालामाल! 1 वर्षात 31.61% ची तेजी
- Mobikwik Share Price: 1 महिन्यात दिले 39.46% चा रिटर्न…आज मोठी तेजी! SELL करावा की HOLD?
- 10 रुपयेपेक्षा कमी किमतीत वोडाफोन आयडिया करणार कमाल! 1 महिन्यात 9% ची तेजी…आज BUY कराल?
- Yes Bank Share Price: 5 वर्षात 45.88% रिटर्न…आज BUY करावा की SELL? बघा तज्ञांची रेटिंग
- ONGC Share Price: प्रसिद्ध तेल कंपनीच्या शेअरच्या किंमतीत होणार वाढ? बघा सध्याची ट्रेडिंग पोझिशन