अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : मारुती अल्टोवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार संरक्षक कठडे तोडून ३० फूट खोल दरीत कोसळली. अकोल्याचे तिघेजण गंभीर जखमी झाले.
ही घटना रविवारी दुपारी नाशिक-पुणे मार्गावरील माहुलीच्या एकल घाटात घडली. मारुती अल्टोमधून (एमएच १२ बीव्ही १२४३) चौघे जण जर्सी गायी घेण्यासाठी आळेफाट्याला जात होते.
कार भरधाव असल्याने वळणावर चालकाचा ताबा सुटला. कार ४-५ पलट्या घेऊन ३० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचा आवाज येताच जवळपासचे नागरिक घटनास्थळी धावले.
खासगी रुग्णवाहिकेतून तिघा जखमींना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. कारमधील अन्य एकजण घाबरून पळून गेला.
कारचालक अक्षय संजय मुटके (२३), शेजल अशोक काटेकर (२४) अशी जखमींची नावे आहेत. तिसऱ्या जखमीचे नाव समजू शकले नाही. हे सर्व अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील रहिवासी आहेत. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews