अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : पारनेर तालुक्यात एका माजी सैनिकाची हत्या झाली आहे,सोयरीकीच्या वादात तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे.
मारहाणीत या जवानाला अक्षरक्ष: दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले. रक्तबंबाळ अवस्थेत आणि डोक्याला खोल जखमा झालेल्या अवस्थेतील या जवानाला नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
जवानाला दगडाने ठेचून मारले असतानाही सुपा पोलिसांनी अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार करीत मयतासह त्याच्या नातेवाईकांना उद्दापणाची वागणूक दिली असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
याबबत सविस्तर वृत्त असे कि पारनेर तालुक्यातील जातेगावात सोयरीकीच्या वादातुन दि. 8 जून रोजी संध्याकाळी लोखंडी रॉडने गुड्डु उर्फ सौरव गणेश पोटघन,
विकी उर्फ दिनेश पोटघन व अक्षय बापु पोटघन यांच्यासह अन्य चार- पाच जणांनी मनोज संपत औटी या माजी सैनिकास त्याच्या घराच्या बाजूला नेले.
बोलत असतानाच या सर्वांनी त्यास बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. काहींनी दगडाने तर काहींनी काठी- गज आणि लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला चढविला.
या मारहाणीत तेथे त्रास होऊ लागल्याने रात्रीच नगरमध्ये नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मयताचा भाऊ तुषार संपत औटी वय – 33 राहणार – वेताळवाडी जातेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुड्डु उर्फ सौरव गणेश पोटघन, विकी उर्फ दिनेश पोटघन व अक्षय बापु पोटघन सर्व राहणार- जातेगाव या तीघांंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews